Film On Shah Bano Case: शाह बानो बेगम प्रकरणावर (Film On Shah Bano Case) चित्रपट बनत आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. लेखक आणि दिग्दर्शक सुपर्णा एस वर्मा (Suparna S Verma) हा चित्रपट बनवणार आहेत. याआधी ते द फॅमिली मॅन, राणा नायडू, द ट्रायल, दिल्लीचा सुलतान आणि मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’ यासारख्या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत.
बॉलिवूड (Bollywood) हंगामाच्या रिपोर्टनुसार सुपर्णा एस वर्मा यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. आता निर्माते या चित्रपटाचे कलाकार आणि क्रू फायनल करण्यात व्यस्त आहेत. शाह बानो प्रकरणावरील चित्रपट या पिढीसाठी खूप महत्त्वाचा असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. या चित्रपटात महिला सक्षमीकरणही दाखवण्यात येणार आहे.
काय होते शाह बानो प्रकरण? शाहबानो प्रकरण 1985 साली चर्चेत आले होते. शाह बानो यांचा विवाह मोहम्मद अहमद खान यांच्याशी झाला होता. लग्नानंतर दोघांनाही पाच मुले झाली, तरीही मोहम्मद अहमद खान यांनी दुसरे लग्न केले. यानंतर शाह बानो आणि अहमद खान यांच्यातील संबंध बिघडू लागले आणि अहमदने तिला घराबाहेर हाकलून दिले.
यानंतर शाहबानो यांनी देखभाल भत्ता मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. वाद वाढत गेल्यावर अहमद खानने शाह बानोला घटस्फोट दिला आणि हुंड्याची रक्कम देऊनही देखभाल भत्ता देण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण न्यायदंडाधिकारी न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि त्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने शाह बानोच्या बाजूने निकाल देत अहमद खान यांना देखभाल भत्ता देण्याचे आदेश दिले.
Box Office : रविवारी ‘फायटर’ने गाजवलं बॉक्स ऑफिस, 287 कोटी क्लबमध्ये दणक्यात एण्ट्री
राजीव गांधी सरकारने हा निर्णय फिरवला: सर्वोच्च न्यायालयाच्या या मोठ्या निर्णयाला काही मुस्लिमांनी विरोध केला. दबावाखाली तत्कालीन राजीव गांधी सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. सरकारने संसदेत घटस्फोट हक्क संरक्षण कायदा 1986 लागू केला, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.