Full list of Filmfare Awards 2024 winners: गांधी नगर, गुजरातमध्ये रविवारी 69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करण जोहर (Karan Johar) आणि मनीष पॉल यांनी शो होस्ट केला. वरुण धवन, जान्हवी कपूर आणि करीना कपूर खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी (celebrities) त्यांच्या अभिनयाने प्रभावित केले. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या श्रेणीत कोणाला पुरस्कार मिळाला…
रणबीर-आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीचा पुरस्कार : या यादीत पहिले नाव आहे बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरचे. रणबीरला (Ranbir Kapoor) ॲनिमलमधील चमकदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर आलिया भट्टला (Alia Bhatt) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्तम दिग्दर्शक: यावेळी फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये ’12वी फेल’ ठरले. या कल्ट चित्रपटासाठी विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरुष: शाहरुख खानच्या ‘डंकी’ या सुपरहिट चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरुष: शबाना आझमी यांना 69 व्या फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: तरूण धुधेजाला ‘धक धक’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला-पुरुष: ‘फरे’ अभिनेत्री अलिझेह अग्निहोत्रीला सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला पुरस्कार मिळाला, तर आदित्य रावलला ‘फराज’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार मिळाला.
Yami Gautam Pregnancy : यामी गौतम प्रेग्नंट? Viral व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
लाइफ टाईम अचिव्हमेंट: यावेळी दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्याने आपल्या चित्रपटातून लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक: राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष: भूपिंदर बब्बल यांना ‘ॲनिमल’मधील ‘अर्जन व्हॅली’ या सुपरहिट गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: शिल्पा रावला ‘बेशरम रंग’साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम पुरस्कार – (एनिमल) प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर आणि गुरिंदर सिगल
सर्वोत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार- अमिताभ भट्टाचार्य (तेरे वास्ते फलक से में चांद लौंगा)
सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले- विधू विनोद चोप्रा (12th फेल)
सर्वोत्कृष्ट कथा – अमित राय (OMG 2) आणि ‘जोरम’ (देबाशिष माखिजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक- विक्रांत मॅसी (12th फेल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक- (शेफाली शाह)
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक- देवाशिष माखिजा (जोरम)