Amol Kolhe : अखेर चॅलेंज पूर्ण, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत. सोशल मिडीयावर देखील […]

Amol Kolhe

Amol Kolhe

पुणे : खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या राजकीय जीवनासह ते अभिनयामुळे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहचले. त्यानंतर त्यांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील तेवढीच गाजली. त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील नाटकांचे अनेक प्रयोग नुकतेच राज्यात विविध ठिकाणी पार पडले आहेत.

सोशल मिडीयावर देखील खासदार आणि अभिनेते असलेले अमोल कोल्हे चांगलेच सक्रिय असतात. आता पुन्हा ते एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते सुर्यनमस्कार घालताना दिसत आहेत. अत्यंत घामाघूम झालेले अमोल कोल्हेंचा सुर्यनमस्कार घालण्याचा स्पीड पाहता हे लक्षात येत की, ते किती तंदुरूस्त असतील.

त्यांनी या व्हिडीओमध्ये आपल्या सुर्यनमस्कार घालण्यामागील पार्श्वभुमी सांगत आहेत. ते म्हणाले की, ‘गेल्या अनेक दिवसांपासून हे 108 सुर्यनमस्कार घालण्याची प्रयत्न करत होतो. हे स्वतः शी चॅलेंज केल होतं. आज अखेर ते पूर्ण झालं आहे. त्यामुळे खूप भारी वाटतयं. जय शिवराय.’ असं या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे सांगतात. तर या व्हिडीओला ‘108 सुर्यनमस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न.’ असे कॅप्शन देखील त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

Amol Kolhe : मानो या ना मानो, अमोल कोल्हेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

Exit mobile version