Series Jaadu Teri Nazar on Star Plus channel : ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) आपल्या प्रेक्षकांकरता वेधक आणि स्वारस्यपूर्ण विषयांवरील मनोरंजनपर मालिका सादर करण्याकरता ओळखली जाते. नात्यांची गुंतागुंत अलवारपणे उलगडणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या भावभावनांना साद घालतात. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर एकाहून एक सरस मालिका (Hindi Serial) आहेत, ज्यांचा उद्देश केवळ प्रेक्षकांचे रंजन करणे इतकाच नाही, तर त्यांचे सबलीकरण करणे हाही आहे.
या मालिकांमध्ये अनुपमा, गुम है किसीके प्यार में, यह रिश्ता क्या कहलाता है, उडने की आशा, माटी से बंधी डोर, झनक, दिल को तुमसे प्यार हुआ, अॅडव्होकेट अंजली अवस्थी, दिवानीयत, इस इश्क का रब रखा अशा अनेक मालिकांचा समावेश (Entertainment News) आहे, ज्या कौटुंबिक नाट्य आणि प्रेमकथा, भावनिक कथा यांवर बेतलेल्या आहेत. या मालिकांना आजवर प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
‘…त्यांनी डिपार्टमेंटला सांगावं’, सैफवर हल्ल्याप्रकरणी राणेंना शंका, अजित पवारांनी केलं स्पष्ट
‘स्टार प्लस’ वाहिनीवर या मालिकेचे कितीतरी गूढ आणि रंजक टीझर व्हिडिओ प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत मोठे कुतुहल निर्माण झाले होते. अखेर ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या बहुप्रतिक्षित सुपरनॅचरल ‘जादू तेरी नजर’ (Jaadu Teri Nazar) या मालिकेचा पहिला वेधक भाग सादर झाला. संध्याकाळी ७:५९ वाजण्यासंबंधीच्या या मालिकेचे गूढ आता उलगडले आहे आणि हा भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांसाठी, पुढे काय होणार याविषयीची आतुरता वाढली आहे. अलौकिक गोष्टींविषयीचे आकर्षणही वाढले आहे.
‘जादू तेरी नजर’ या मालिकेच्या पहिल्याच भागात, प्रेक्षकांना श्रेणू पारिख या भयावह पात्राची ओळख झाली, एक चेटकीण, जी वाईट गुण अंगी असलेल्या एका मुलाला जन्म देते. श्रेणूचे पात्र, जोखमींनी भरलेले आहे, त्या मुलाचा कृष्णकृत्ये करण्याच्या हेतूंसाठी वापर करण्याचे वचन ती देते, ज्यामुळे कथा प्रखर आणि रंजक नाट्यमय झालेली आहे. या भागात आणखी एका पात्राची एक झलक दिसते, जो एका मुलीला जन्म देतो, ज्यामुळे उलगडणाऱ्या अलौकिक गाथेत गूढता आणि सस्पेन्सचे आणखी थर जोडले जातील.
आगीची अफवा पळापळ अन् जीव वाचण्यासाठी उड्या; पुष्पकच्या अपघाताने मुंबईतील ‘तो’ अपघात चर्चेत
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘जादू तेरी नजर’ कृष्ण रहस्यांनी आणि वेधक नाट्याने भरलेली एक अलौकिक कथा आहे. पहिल्या भागाने आधीच उत्साह निर्माण झाला आहे आणि चाहते ‘जादू तेरी नजर’ या अलौकिक मालिकेच्या पुढील भागाची, आतुरतेने वाट पाहत आहेत.