‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या आठवणींना विद्या बालनने दिला उजाळा, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Vidya Balan The Dirty Picture: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री आणि नृत्यांगना सिल्क स्मिताच्या जीवनातून आणि सत्य कथेपासून प्रेरित असलेला संगीतमय चित्रपट होता. आज या चित्रपटाने 12 वर्ष पूर्ण केली आहेत. मिलन लुथरिया (Milan Luthria) दिग्दर्शित आणि विद्या बालन (Vidya Balan), इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांच्या महत्त्वपूर्ण […]

‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या आठवणींना विद्या बालनने दिला उजाळा, पोस्ट शेअर करत म्हणाली…

‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाच्या आठवणींना विद्या बालनने दिला उजाळा, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Vidya Balan The Dirty Picture: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री आणि नृत्यांगना सिल्क स्मिताच्या जीवनातून आणि सत्य कथेपासून प्रेरित असलेला संगीतमय चित्रपट होता. आज या चित्रपटाने 12 वर्ष पूर्ण केली आहेत. मिलन लुथरिया (Milan Luthria) दिग्दर्शित आणि विद्या बालन (Vidya Balan), इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट 2 डिसेंबर 2011 रोजी जगभरात हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला.


विद्याचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परिणीता’ हा पहिला सिनेमा एकदम सुपरहिट ठरला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात हा सगळा अनोखा प्रवास विद्यासाठी सोपा नव्हता. कहानी, पा, शकुंतला देवी अशा अनेक वेगवेगळ्या सिनेमांत विद्याने एकापेक्षा एक सरस भूमिका बजावल्या आहेत. विद्याच्या ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमाने तर अगदी धूम केली. या सिनेमामध्ये विद्याने कधी नव्हे इतकी बोल्ड भूमिका साकारली होती. विद्याने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला आहे. परंतु, तिचा इतपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवामध्ये विद्या बालन म्हणाली की, जेव्हा तिला ‘द डर्टी पिक्चर’मध्ये सिल्क स्मिताच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, त्यावेळेस तिचा खरोखर विश्वास बसत नव्हता. अभिनेत्री म्हणते, ‘मिलन लुथरिया पहिल्यांदा माझ्याकडे आलेले त्यावेळेस मला वाटलं, ‘तुम्ही चुकीच्या दारात तर आला नाही ना?’ कारण मला कोणीतरी खरोखरच ही भूमिका ऑफर करेल, यावर विश्वास बसत नव्हता.

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला !

विद्या बालनने याबाबत पुढे खुलासा केला की, जेव्हा तिने सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी होकार दिला, त्यावेळेस लोकांनी तिला सावध केले होते. सिनेमात ही मुख्य भूमिका केल्याने तिचं करिअर उद्ध्वस्त होईल, अनेक लोकांनी तिला सल्ला दिला होता. अभिनेत्री म्हणाली- ‘तिथे काही लोक होते ज्यांनी मला विचारले, ‘तुला खात्री आहे का? यामुळे तुमचे करिअर बर्बाद होणार आहे.

‘डर्टी पिक्चर’ या सिनेमामध्ये विद्या बालनने सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारली होती. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. यामध्ये विद्यासोबत इमरान हाश्मी आणि नसीरूद्दीन शाह हे मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळाले होते.

Exit mobile version