fresh chemistry between Bhushan Pradhan and Sayali Patil in ‘Swapnasundari’ : मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक नवी, आकर्षक आणि तितकीच उत्सुकता वाढवणारी जोडी मिळाली आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री सायली पाटील आगामी ‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र झळकणार असून, या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. रोमँस, भावना, हलकाफुलका मनोरंजनाचा बाज आणि एकमेकांना पूरक ठरणारा स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ही जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि गाणे प्रदर्शित झाल्यापासून या दोघांची जोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
वयाच्या नव्वदीत आण्णा हजारेंचं सरकारविरोधात आंदोलन, सरकारला पत्र पाठवत दिला अल्टिमेटम
मराठी इंडस्ट्रीचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा भूषण प्रधान आपल्या प्रत्येक भूमिकेतून वेगळी छाप पाडत असतो. तर सायली पाटीलनेही आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यामुळे या दोघांची जोडी पडद्यावर कशी दिसणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट आजच्या तरुणाईच्या भावविश्वाशी जोडलेला विषय हाताळणार आहे. योग्य जोडीदाराचा शोध, नात्यांमधील गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग यांची मनोरंजक मांडणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी 50 कोटींची भव्य गुंतवणूक
भूषण प्रधान म्हणाला, “सायलीसोबत काम करताना खूप सहज आणि कम्फर्टेबल वाटलं. पहिल्याच चित्रपटात आमचं ट्यूनिंग इतकं छान जुळलं की, आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखत असल्यासारखं वाटत होतं. कलाकार म्हणून ती अत्यंत प्रामाणिक आहे. पडद्यावर दिसणारी आमची केमिस्ट्री ही नैसर्गिक आहे आणि ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे.”
‘आई तारी तिला कोण मारी’चा आशय अधिक प्रभावीपणे उलगडणारा ‘मर्दिनी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
सायली पाटील म्हणाली, “भूषणसोबत काम करणं हा खूप छान अनुभव होता. तो एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण त्याच्यासोबत काम करताना खूप शिकायलाही मिळालं. आमची जोडी पूर्णपणे फ्रेश असल्यामुळे त्यात एक वेगळीच उत्सुकता आहे. प्रेक्षकांना या नव्या जोडीचा प्रवास नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.”
रेस ट्रॅकचा ‘अल्फा’! भारतातील सर्वात वेगवान धावपटू बनल्यानंतर गुरिंदरवीर सिंगची पहिली मुलाखत
रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केले आहे. निर्मिती सतीश महादेव गेजगे यांची असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे सहनिर्माते आहेत. दरम्यान, भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी प्रेक्षकांना आता २४ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
