बॅनपासून ऐतिहासिक गौरवापर्यंत रंग दे बसंतीच्या 20व्या वर्षी राकेश मेहरांचा प्रवास

रंग दे बसंतीवर बॅनही लावण्यात आला होता. आम्ही त्याला सामोरे गेलो आणि अखेरीस अधिकाऱ्यांना चित्रपटाचा खरा उद्देश समजला.

News Photo   2026 01 23T151532.216

बॅनपासून ऐतिहासिक गौरवापर्यंत रंग दे बसंतीच्या 20व्या वर्षी राकेश मेहरांचा प्रवास

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती हा असा (Film) चित्रपट आहे, ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम दिला आणि सामाजिक विषयांवरील सिनेमांची दिशा बदलली. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला येत्या २६ जानेवारीला २० वर्षे पूर्ण होत आहेत. आमिर खानसोबत शरमन जोशी, सिद्धार्थ आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.

देशभरात चर्चेचा विषय ठरलेला रंग दे बसंती आजही त्या काळातील सर्वात लक्षात राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाच्या २० वर्धापनदिनाआधी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरांनी चित्रपट निर्मितीच्या काळात आलेल्या अडचणींबद्दल भाष्य केले. प्रदर्शना वेळी या चित्रपटावर बॅनही लावण्यात आला होता, मात्र नंतर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते.

देवखेळ मधल्या आठवणी बद्दल काय म्हणाली प्राजक्ता माळी !

“रंग दे बसंतीवर बॅनही लावण्यात आला होता. आम्ही त्याला सामोरे गेलो आणि अखेरीस अधिकाऱ्यांना चित्रपटाचा खरा उद्देश समजला. त्या वेळी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणब मुखर्जी यांनी हा चित्रपट पाहिला होता. दिल्लीमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे तिन्ही प्रमुख एका थिएटरमध्ये चित्रपट पाहायला आले होते. पुढे प्रणब मुखर्जी भारताचे राष्ट्रपती झाले. या अनुभवातून मला हे शिकायला मिळाले की कथा सांगताना तिला परवानगी मिळेल की नाही याचा विचार करू नये. तेव्हाच खऱ्या आणि प्रामाणिक कथा समोर येतात.”
ते पुढे म्हणाले,

“जर तुम्ही फक्त परिणामांचा विचार करत असाल आणि प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असाल, तर ते चुकीचे आहे. माझ्या मते सामाजिक सिनेमा नेहमीच अस्तित्वात होता आणि पुढेही राहील. तो कायम समाज आणि नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडत राहतो.” राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंतीमध्ये आमिर खान, सिद्धार्थ, सोहा अली खान, शरमन जोशी, कुणाल कपूर आणि अतुल कुलकर्णी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाची कथा काही निष्काळजी भारतीय तरुणांच्या आयुष्याभोवती फिरते, जे स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित एका डॉक्युमेंट्रीचा भाग बनतात. जसे-जसे ते क्रांतिकारक नायकांच्या भूमिका साकारतात, तसतसे त्यांना राजकीय भ्रष्टाचार आणि अन्यायाची जाणीव होते. अखेरीस ते एक धाडसी पाऊल उचलतात, जे त्यांच्या आयुष्याबरोबरच विचारसरणीलाही कायमचे बदलून टाकते.

Exit mobile version