Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या गदर-2 (Gadar 2) या आगमी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. गदर-2 हा सिनेमा ११ ऑगस्ट या दिवशी रिलीज होणार आहे. गदर-2 या सिनेमाची टीम सध्या या सिनेमाचे प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अमिषाने ओटीटीवरील कंटेन्टबाबत (OTT) धक्कादायक भाष्य केले आहे.
एका मुलाखतीच्या दरम्यान अमिषाने ओटीटीवरील कंटेन्टबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. म्हणाली, ‘चाहत्यांना फक्त क्लिन फिल्म्स पाहायला आवडत असतात. त्यांना असा सिनेमा पाहायचा असतो, ज्याचा आनंद ते फॅमिलीबरोबर बसून घेऊ शकतात. आता सध्याच्या काळात ओटीटीवर खूप वेगळा कंटेन्ट दाखवला जात आहे. हा कंटेन्ट काही वयातही लोकांना योग्य नाही. असा कंटेन्ट दिसत नाही, जो आपल्या मुलांबरोबर आणि आजी-आजोबांबरोबर बसून पाहिला जाऊ शकेल.
तसेच पुढे अमिषा म्हणाली की, ‘समलैंगिक विषयावर आधारित असणारे सिनेमे आणि वेब सीरिजबद्दल बोलायचे तर ते ओटीटीवर खूप मोठ्या प्रमाणात दाखवले जाते. ओटीटीवर आता पूर्णपणे होमो, लेस्बियन यांच्यावर आधारित सीन्स दाखवले जात आहेत, जे पाहत असताना तुम्हाला तुमच्या मुलाला दाखवण्या लायक नसत. अनेकदा तुम्हाला टीव्हीला चाइल्ड लॉक देखील करावे लागत आहे. कारण लहान मुलं ओटीटी प्लॅटफॉर्म ओपन करू शकणार नाहीत.
‘भूलभुलैया’ आणि ‘रेस 2’ यांसारख्या सिनेमामध्ये अमिषाने तिची कला तिने दाखवली आहे. अमिषाने तिच्या अभिनयानं कायम चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता अमिषाच्या ‘गदर 2’ या सिनेमाची चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागली आहे. ‘गदर 2’ या सिनेमामध्ये अमिषा ही पुन्हा एकदा ‘सकीना’ ची भूमिका साकारत असताना दिसून येणार आहे. तसेच सनी देओल देखील. पुन्हा एकदा ‘तारा सिंह’ ही भूमिका साकारत असताना दिसणार आहे.
सेक्रेड गेम्स 2 मध्ये इंटिमेट सीन शूट करताना मासिक पाळीच्या… अमृता सुभाषने सांगितला अनुभव
या सिनेमाचा टीझर गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. ‘गदर 2’ हा सिनेमा ‘गदर एक प्रेम कथा’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. गदर एक प्रेम कथाने तब्ब्ल २२ वर्षांपूर्वी १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा सिनेमा आहे. आता ‘गदर 2’हा सिनेमा किती कमाई करणार आहे? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अनिल शर्मा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात अमिषा आणि सनी देओल यांची जोडी पाहायला चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.