Download App

Box Office New Record: १०० वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये सनी पाजीच्या ‘गदर२’ची तीन दिवसांची कमाई तब्बल…

Gadar 2 Jailer OMG 2 Box office : बॉलीवूडमध्ये (Bollywood) सध्या मोठ्या अनेक हलक्या सिनेमांची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती सनी पाजीच्या गदर २ ची बॉक्स ऑफिसवर (Box office) हा सिनेमा सर्वात जास्त धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. यासगळ्यात भारतीय सिनेमा विश्वात गेल्या १०० वर्षामध्ये जे घडलं नाही ती किमया गदर२ (Gadar 2) या सिनेमाने केल्याचे दिसत आहे.

११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत भारतीय मनोरंजन विश्वामध्ये एक मोठी घडामोड घडल्याचे बघायला मिळत आहे. सध्या प्रदर्शित झालेल्या ४ सिनेमाविश्वांनी मनोरंजन क्षेत्र अगदी हादरून टाकले आहे. गदर २, जेलर, आणि ओएमजी 2 या सिनेमांनी एका आठवड्यामध्ये तब्ब्ल ४०० कोटींहून सर्वात मोठी कमाई केल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय सिनेमा विश्वामध्ये पहिल्यांदा असा मोठा विक्रम केल्याचे बघायला मिळत आहे.

पहिल्यांदा एका आठवड्यामध्ये २ कोटींपेक्षा सर्वात जास्त चाहत्यांनी सिनेमा बघण्याचा आनंद लुटला आहे. गदर २, ओएमजी २ हे हिंदी सिनेमा आहेत. तर थलायवाचा जेलर आणि चिरंजीवी यांचा भोलाशंकर हे तेलगू सिनेमा आहे. त्यांना चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. गदर २ हा सिनेमा तब्बल २२ वर्षांनी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तर ओएमजी २ हा ८ वर्षांनी चाहत्यांचे पुन्हा एकदा मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत आहे.

New Jersey : अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली!

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियानं जाहीर केलेल्या एका पत्रकात त्यांनी माहिती दिली आहे की. त्यामध्ये भारतीय मनोरंजन विश्वामध्ये गेल्या १०० वर्षात अशी कामगिरी कोणत्याही सिनेमांनी केली नव्हती, ती या ४ सिनेमांनी केली आहे. एका आठवड्यात २ कोटींपेक्षा जास्त चाहते येण्याची घटना तब्ब्ल १० वर्षांनी घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. रविवारी गदर २, ओएमजी २ आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या ३ सिनेमांनी मिळून ७२ कोटींची कमाई केल्याचे बघायला मिळत आहे. यासोबत हिंदी सिनेमांनी देखील एक आगळा वेगळा विक्रम समोर आला आहे. एका दिवशी सर्वात जास्त कमाई करण्याची कामगिरी या ३ सिनेमांनी केली आहे. गदर २ च्याविषयी सांगायचं झाल्यास या सिनेमाने पहिल्या दिवशी आठवड्यात १३५ कोटींची कमाई केल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us