Game Changer: साऊथ स्टार्स राम चरण (Ram Charan) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. येत्या १० जानेवारीला रामचरणचा ‘गेम चेंजर’ (Game Changer) चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट काहीच दिवसांमध्ये रिलीज होत असल्याने सध्या सिनेमाचं प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. या गाण्यांवर चित्रपट निर्मात्यांनी सुमारे 75 कोटी रुपये खर्च केले आहेत.
ब्रेल लिपीचे जनक यांची 215 वी जयंती; ‘या’ तारखेला अहिल्यानगरमध्ये अंध व्यक्तीसाठी कार्यशाळेचं आयोजन
‘गेम चेंजर’ सिनेमातून कियारा अडवाणी पहिल्यांदाच साउथमध्ये काम करतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी दिग्दर्शन केलेय. या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या तीन गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. या चित्रपटातील गाण्यांवर चित्रपट निर्मात्यांनी सुमारे 75 कोटी रुपये खर्च केलेत. सुंदर लोकेशन्स, भव्य सेट, नेत्रदीपक नृत्य हे या गाण्यांमध्ये बघायला मिळणार आहे.
गाण्यांची विशेषता:
1. जरागंडी हे गाणे 70 फूट उंच डोंगरावर भव्य सेट उभारून शुट केलं. 13 दिवसांपेक्षा जास्त काळ हे गाणं चित्रित करायला लागलं. सुमारे 600 नर्तकांचा समावेश या गाण्यात असून प्रभू देवाने हे गाणं कोरिओग्राफ केले. त्याने दिग्दर्शक शंकर यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. शंकर यांनीच आपल्याला अभिनेता म्हणून लॉन्च केल्याचं तो म्हणाले. या गाण्यासाठी पहिल्यांदाच इको फ्रेंडली पोशाख वापरण्यात आला.
2. रा मचा मचा हे गाणं गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केलं. हे गाणं अनेक नृत्य प्रकार आणि लोककलांचा संगम आहे. या गाण्यात 1000 हून अधिक लोकनर्तक सहभागी आहेत.
प्रवाशांचा वेळ वाचणार; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता…
3. नाना हयाना हे पहिले भारतीय गाणे आहे, जे ‘इन्फ्रारेड कॅमेऱ्यावर’ शूट केले गेले आहे, राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्यावर न्यूझीलंडमधील सुंदर ठिकाणी हे गाणं चित्रित झालं. हे गाणे पाश्चात्य आणि कर्नाटकी आवाजांचे मिश्रण आहे. त्याचे वर्णन ‘ट्युन ऑफ द इयर’ असे करण्यात आले आहे. मनीष मल्होत्राने गाण्यासाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. देशभरातील अनेक नर्तकांसह 6 दिवसांहून अधिक काळ हे गाणं चित्रित केलंय.
4. ढोप हे गाणे टेक्नो डान्स नंबर आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हे चित्रीकरण करण्यात आले होते. या गाण्यासाठी खास विमानातून सुमारे 100 व्यावसायिक नर्तकांना रशियातून आणण्यात आले होते. हे गाणे RFC येथे तीन वेगवेगळ्या भव्य सेटमध्ये 8 दिवसांहून अधिक भव्यपणे चित्रित केले गेले. मनीष मल्होत्राने गाण्यासाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत.
5. 5 वे गाणे एक सरप्राईज पॅकेज आहे – प्रेक्षकांनी ते रुपेरी पडद्यावर पहावे आणि थ्रिल अनुभवावा अशी चित्रपट निर्मात्यांची इच्छा आहे.
दरम्यान, गेम चेंजरमध्ये राम चरणसह कियारा अडवाणी, अंजली, एसजे सूर्या, श्रीकांत आणि समुथिराकनी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.