गेम चेंजरमधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, कियारा अडवाणी अन् राम चरणचा जबरदस्त जलवा

गेम चेंजरमधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, कियारा अडवाणी अन् राम चरणचा जबरदस्त जलवा

Global star Ram Charan’s new song Dhop Released : ग्लोबल स्टार राम चरणचा (Ram Charan) गेम चेंजर हा चित्रपट 2025 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पोंगल सणाच्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन गाणे धोप रिलीज केले आहे. आता हे गाणे व्हायरल होत आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडते. जगभरात लोकप्रिय असलेल्या तीन हिट गाण्यांनंतर, आता राम चरणच्या गेम चेंजरमधील आणखी एक आश्चर्यकारक गाणं ‘धोप’ (Dhop Song) प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.

महायुतीत पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू? मुंबईवरून भाजप अन् शिवसेनेत स्पर्धा, अजित पवार गटाचं काय?

निर्माते दिल राजूच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या ‘धोप’ गाण्याचा टीझर रिलीज झालाय. म चेंजरच्या डॅलासमधील प्री-रिलीझ इव्हेंटसह या गाण्याचे मोठे आंतरराष्ट्रीय पदार्पण झालंय. संपूर्ण गाणे तुमच्या प्लेलिस्टमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज (Game Changer movie) आहे. हे गाणं थमन, रोशिनी जेकेव्ही आणि प्रदवी सृती रंजनी यांनी गायले आहे, तर गीत राम जोगय्या शास्त्री यांनी लिहिले आहे. विवेकने लिहिलेल्या तमिळ आवृत्तीमध्ये थमन एस, अदिती शंकर आणि प्रदवी सृती रंजनी यांचे आवाज आहेत. रकीब आलम यांनी लिहिलेल्या हिंदी आवृत्तीत थमन एस, राजा कुमारी आणि प्रदवी सृती रंजनी यांचा आवाज आहे.

नितेश राणे ते नरहरी झिरवाळ.. चर्चेतल्या पाच मंत्र्यांना वजनदार खाती, जाणून घ्या..

डॅलसमध्ये “धोप” मोठ्या धूमधडाक्यात लाँच करण्यात आलं. तिथे एक रोमांचक काउंटडाउन झालं. गेम चेंजरच्या टीमचे शेकडो चाहत्यांनी स्वागत केलं. राम चरण यांच्याशी त्यांची वैयक्तिक भेटही झाली. यानंतर, एक मोठा कार्यक्रम झाला. ज्यामध्ये स्टार्सची नेत्रदीपक एन्ट्री, रंजक चर्चा आणि गाण्यांशी संबंधित मजेदार किस्से शेअर केले गेले, जे प्रेक्षकांना खूप आवडले.

मेगा पॉवरस्टार राम चरण दिग्दर्शक शंकरसोबत गेम चेंजर या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अंजली, एस.जे. सुर्या, श्रीकांत आणि समुथिरकानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स, दिल राजू प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजच्या बॅनरखाली दिल राजू आणि सिरिश यांनी तयार केला आहे. चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube