आगामी चित्रपटातील कियारा- राम चरणचा लूक होतोय व्हायरल, चाहते झाले फिदा

आगामी चित्रपटातील कियारा- राम चरणचा लूक होतोय व्हायरल, चाहते झाले फिदा

Kiara Advani- Ram Charan Game Changer Look Leak: राम चरण (Ram Charan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) ‘गेम चेंजर’ (Game Changer Movie) चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या दोन्ही चित्रपटांची शूटिंग सुरू असून हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘गेम चेंजर’ ची रिलीज डेट अद्याप निश्चित झालेली नाही किंवा निर्मात्यांनी कोणतेही पोस्टर किंवा टीझर रिलीज केलेला नाही, मात्र सध्या सोशल मिडीयावर कियारा आणि राम चरणचा लूक सिनेमातील लूक पाहायला मिळाला आहे.

कियारा अडवाणी आणि राम चरण यांच्या लूकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या विशाखापट्टणममध्ये ‘गेम चेंजर’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरून व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये कियारा क्रीम ब्लाउजसह निळ्या रंगाची बनारसी साडी परिधान करताना दिसत आहे. कपाळावर बिंदी घातलेली आणि केस पोनीटेलमध्ये बांधलेली ही अभिनेत्री अतिशय साध्या आणि फॉर्मल लूकमध्ये दिसली.

राम चरणचा लूकही लीक

राम चरणच्या लूकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये, अभिनेता फिकट गुलाबी रंगाचा शर्ट, फॉर्मल पँट आणि शूज परिधान केलेला दिसतो. राम चरणने रिमलेस चष्म्यांसह आपला लूक पूर्ण केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसत आहे.

अदा शर्माच्या ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…

राम चरण चेहरा झाकण्याचा प्रयत्न करताना दिसला

राम चरणचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता चेहरा झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत होता.

काय असेल ‘गेम चेंजर’ची कथा?

‘गेम चेंजर’ हा एक राजकीय ड्रामा असणार आहे, जो सत्य घटनांवर आधारित असणार आहे. राम चरण या चित्रपटात राजकीय रणनीतीकाराची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राम चरण आणि कियारा व्यतिरिक्त अंजली, जयराम, सुनील, समुथिराकनी, नवीन चंद्रा आणि नस्सर देखील दिसणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube