Ram Charan अन् सुकुमारच्या प्रोजेक्टला संगीत देण्यास रॉकस्टार डीएसपी सज्ज!

Ram Charan अन् सुकुमारच्या प्रोजेक्टला संगीत देण्यास रॉकस्टार डीएसपी सज्ज!

Ram Charan : दक्षिणात्य सुपरस्टार रामचरण ( Ram Charan) आणि पुष्पा या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या अगोदर त्यांनी 2018 ला रंगस्थलम या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांच्या या आगामी प्रोजेक्टला संगीत देण्यासाठी प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद म्हणजेच रॉकस्टार डीएसपी सज्ज झाला आहे.

जानकरांची एन्ट्री… विटेकरांचा बळी देऊन अजितदादांनी बारामती सेफ केली?

प्रख्यात दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता राम चरण हे त्यांच्या पुढच्या प्रोजेक्ट साठी तयारी करत असताना देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी या चित्रपटाचे संगीत करणार आहेत. हा प्रोजेक्ट खास आहे कारण या तिघांनी यापूर्वी ‘रंगस्थलम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.रॉकस्टार डीएसपीनेही ट्विटरवर जाऊन या प्रोजेक्ट बद्दल खास बातमी दिली चाहत्यांना या आगामी चित्रपटा बद्दल खूप उत्सुकता आहे यात शंका नाही.

Ahmednagar : महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूतस्कराकडून तहसीलदारांना शिवीगाळ; कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

या वर्षाच्या उत्तरार्धात निर्मिती सुरू होणार असल्याचं कळतंय शीर्षक नसलेल्या चित्रपटाच 2025 च्या शेवटच्या तिमाहीत भव्य प्रदर्शन होणार असल्याचा चर्चा आहेत. चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers द्वारे केली जात आहे आणि त्याचे लेखन सुकुमार यांनी केले आहे. कामाच्या आघाडीवर डीएसपी अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट करणार असून 2024 च्या रिलीजमध्ये पवन कल्याण-स्टार ‘उस्ताद भगत सिंग’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, सुर्या-स्टार ‘कंगुवा’, धनुष-स्टार ‘कुबेरा’, विशाल-स्टार ‘रथनम’, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द’ यांचा समावेश असून नागा चैतन्य-स्टार ‘थंडेल’ हा सुद्धा प्रोजेक्ट करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube