Ahmednagar : महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळूतस्कराकडून तहसीलदारांना शिवीगाळ; कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील ( Ahmednagar ) कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडुन कोपरगावचे तहसीलदार संदिप कुमार भोसले व वाळू उपसा प्रतिबंधक पथकास शिवीगाळ व दमबाजी करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज कोपरगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
घराचे महाभारत कोणी केलं? विचारत सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंना रूपाली पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
सदर वाळूमाफियांना तत्काळ अटक करण्यात यावी, वाळू उपसा प्रतिबंधक पथकास सशस्त्र संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध असतांना कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वनीकरण विभागानजीक अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने त्यांना हटकले.
Ekta Kapoor: कंगना रणौत आता ‘लॉक अप 2’ होस्ट करणार नाही? अभिनेत्रीने सांगितले सत्य
त्यावेळी वाळू माफियांकडून शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. तसेच अन्य वाळू तस्कराना बोलावून घेऊन महसुली कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व तहसीलदार संदीप भोसले यांनाही दमदाटी करून, “तुम्ही टेंपो लगेच सोडा अन्यथा तुम्हाला नोकरी करून देणार नाही” अशी धमकी दिली होती.
सदर प्रकारानंतर त्या वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर गुन्हेगाराना अद्याप अटक झालेली नाही. सदर घटनेच्या निषेधार्थ व त्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज कोपरगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.