Ram Charan च्या 17 व्या चित्रपटाची घोषणा; रंगस्थलमनंतर पुन्हा एकदा पुष्पाचे दिग्दर्शकासोबत काम करणार
Ram Charan : दक्षिणात्य सुपरस्टार रामचरण ( Ram Charan) आणि पुष्पा या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या अगोदर त्यांनी 2018 ला रंगस्थलम या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रामचरणचा सतरावा चित्रपट असणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबद्दल घोषणा केली.
महुआ मोईत्रांना टफ फाईट देणार ‘राजमाता’? भाजपच्या उमेदवार आहेत तरी कोण?
रामचरण याच्या चित्रपटाबद्दल घोषणा करताना निर्मात्यांनी आपल्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहिली. यामध्ये म्हटले आहे की, एका ग्रेट चित्रपटासाठी शक्तिशाली लोक पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. ज्यामध्ये ग्लोबल स्टार रामचरण, एक्स दिग्दर्शक सुकुमार, प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद म्हणजेच रॉकस्टार डीएसपी, मैत्री ऑफिशियल हे सर्व या प्रोजेक्टमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. या पोस्टमध्ये रामचरण आणि सुकुमार यांचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दोघे एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत.
Mighty forces reunite for an earth-shattering magnum opus 🔥❤🔥
Global Star @AlwaysRamCharan X The Maverick Director @aryasukku X Rockstar @ThisisDSP X @MythriOfficial X @SukumarWritings = #Raring2Conquer 🐎#RC17 is all set to add new colours to the Indian Cinema ❤🔥 pic.twitter.com/ISRZaumDng
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) March 25, 2024
Lok Sabha Elections 2024 : कॉंग्रेस उमेदवारांची सहावी यादी जाहीर! कुठं, कोणाला संधी?
रामचरणच्या चित्रपटाची बातमी येताच त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतोय दरम्यान रामचरण सध्या त्याच्या आरसी 16 या चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट बुच्ची बाबू सना हे दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जानवी कपूर आणि रामचरण पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
तसेच रामचरणच्या आगामी गेम चेंजर या चित्रपटाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यामध्ये तो कियारा अडवाणीसोबत पाहायला मिळणार आहे. एस एस राजमौला यांच्या आरआरआरमध्ये ज्युनिअर एनटीआर सोबत पाहायला मिळाला होता.