गेम चेंजरमधील ‘जाना हैराण सा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीजपूर्वी का काढून टाकलं होतं?
Naanaa Hyraanaa Song Added In Game Changer Movie : ग्लोबल स्टार राम चरण (Ram Charan) यांचा बहुप्रतिक्षित गेम चेंजर हा चित्रपट 2025 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून समोर आलाय. गेम चेंजर 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रचंड कलेक्शन आणि कौतुकास्पद पुनरावलोकनांसह, गेम चेंजर (Game Changer) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. गेम चेंजर’ रिलीज होण्यापूर्वी काढून टाकलेले जान ‘जाना हैराण सा’ गाणे पुन्हा जोडलं गेल्याचं समोर आलंय.
रिलीजपूर्वी राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटातील गाणे तांत्रिक कारणामुळे काढून टाकण्यात आले. ‘जाने हरण सा’ हटवल्याची माहिती ‘गेम चेंजर’च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. चित्रपटातून हे गाणे काढून टाकल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली होती, मात्र आता ते दुसऱ्या दिवशी पुन्हा जोडलं गेलंय.
उद्धव ठाकरेंना जागा दाखवली अन् शरद पवारांना …, अमित शाहांची जहरी टीका
कार्तिक आणि श्रेया घोषाल यांनी गायलेले ‘नाना ह्यराणा’ हे गाणं एस. थमन यांनी संगीतबद्ध केलंय. “सरस्वतीपुत्र” रामजोगय्या शास्त्री यांनी लिहिली आहेत. हे गाणे पाश्चात्य आणि कर्नाटकी ध्वनींचे मिश्रण आहे. ते प्रेक्षकांना एक सुरेल आकर्षण देते. विवेकने तमिळ गीते लिहिली आहेत, तर कौसर मुनीरने हिंदीमध्ये तयार केलीत. हे गाणे न्यूझीलंडमध्ये पाच दिवसांत चित्रित ( Naanaa Hyraanaa Song० केलंय. “इन्फ्रारेड कॅमेरा” वापरून चित्रित केलेले हे पहिले भारतीय गाणे आहे. ते स्पष्ट रंग आणण्यासाठी आणि स्वप्नासारखे दृश्य तयार करण्यासाठी ओळखले जाते. बॉस्को मार्टिन यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले.
बांग्लादेशी घुसखोर…राज्यात वोट जिहाद सुरू झालंय; CM फडणवीसांचा गंभीर आरोप
राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्यातील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी एक दृश्यात्मक मेजवानी आहे. आश्चर्यकारक दृश्यांसह एकत्रित केलेला हा सुरेल ट्रॅक आजपासून थिएटरमध्ये प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज आहे. गेम चेंजरमध्ये राम चरण एक शक्तिशाली आयएएस अधिकारी आणि एक प्रामाणिक समाजसुधारक अशा दुहेरी भूमिकेत आहेत.
अंजली, एसजे सूर्या, श्रीकांत, समुथिरकणी, नवीन चंद्रा आणि इतरांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिल राजू आणि शिरीष यांनी श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स, दिल राजू प्रॉडक्शन्स आणि झी स्टुडिओजच्या बॅनरखाली चित्रपटाचे नेतृत्व केले आहे. एसव्हीसी आदित्यराम मूव्हीजने तमिळ आवृत्तीची निर्मिती केली आहे, तर एए फिल्म्सचे अनिल थडानी हिंदी आवृत्तीची जबाबदारी सांभाळत आहेत.