बांग्लादेशी घुसखोर…राज्यात वोट जिहाद सुरू झालंय; CM फडणवीसांचा गंभीर आरोप
CM Devendra Fadanvis In BJP Adhiveshan Shirdi : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालंय. त्यानंतर आता शिर्डीत भाजपचं दोन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडतंय. राज्यभरातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांनी या अधिवेशनाला हजेरी लावलीय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) देखील संबोधित केलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक भारतातील चाणक्य असं म्हणत अमित शाह यांचे आभार मानले. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, नारायण राणे, अशोक चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, राधाकृष्ण पाटील यांसह उपस्थित मान्यवरांना धन्यवाद दिले.
देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू असल्याचं सिद्ध केलं; चंद्रशेखर बावनकुळे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शाह यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. ज्याप्रकारे ही लढाई तुम्ही समोरून लढलात त्याबद्दल तुमचे आभार. हे अधिवेशन शिर्डीत घेतल्यामुळे खूप आनंदी (BJP Adhiveshan Shirdi) आहे. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय. तो भाजपात महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम ही श्रद्दा असून मी अंत ही सबुरी आहे. ज्यांना हा मंत्र समजला त्यांचं कल्याण झालं, ज्यांना नाही समजला त्यांची अवस्था बुरी झाली, असं देखील फडणवीस म्हणालेत.
महाकुंभांचं पर्व देशात सुरू होतंय. महाकुंभाचं अमृत प्राप्त करण्याकरता हजारो लोक त्याठिकाणी एकत्र होणार आहेत. महाराष्ट्राच्या जनेतेने तीन वेळा भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त दिल्या. गेल्या तीस वर्षाच्या इतिहासात हे झालंय. याप्रकारचा विजय झाल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं जी-6 तयार झालंय. ज्याप्रकारचा विजय लोकसभेच्या निवडणुकीत झाला, 35 टक्के मार्क घेवून आपण काठावर पास झालो होतो. त्यानंतर माननीय मोदींच्या नेतृत्वात केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात इतिहास आपण तयार केलाय. मेरिटमध्ये भाजप पास झाला. महायुतीला 237 जागा मिळाल्यात. या विजयाचे शिल्पकार निवडणुकीच्या युद्धात केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी निभावली, मोदीची माधव होते. या केशव अन् माधवांमुळे मिळालाय. असं म्हणत मिळालेला विजयाचं श्रेय मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांना दिलंय.
धनंजय मुंडे राजीनामा कधी देणार? विचारताच अजित पवार भडकले; म्हणाले, तुझं नाव…
येत्या काळात आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत. आपण सर्व एका ध्येयाकरता काम करतो. चाणक्य म्हणतो की, राजा बनना सुखी बनने का मार्ग नहीं है. आपल्याला शासन सुखासिन होण्याकरता मिळालेलं नाही. तर जनतेला सुखी करण्याकरता काम करायचं आहे. जिंकलो म्हणून थांबलो तर, जनतेने दिलेल्या आशिर्वादासोबत द्रोह होईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.