Download App

Gaurav More: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचा ‘सलमान सोसायटी’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला!

Gaurav More On Salman Society Movie : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे (Gaurav More) आता ‘सलमान सोसायटी’ (Salman Society) या मराठी सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) या धमाकेदार सिनेमात तो एका वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळणार आहे. 17 नोव्हेंबर 2023 दिवशी हा मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


‘सलमान सोसायटी’ (Salman Society Movie) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील एक सॉन्ग सध्या प्रदर्शित करण्यात आले असून ‘पार्टी दणाणली…’ असे या गाण्याचे बोल असून यामध्ये पुष्कर लोणारकर, गौरव मोरे (Gaurav More), शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आला आहे.

‘सलमान सोसायटी’या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन कैलाश पवार यांनी केलं आहे. ‘सलमान सोसायटी’ हा सिनेमा शिक्षणावर आधारित भाष्य करणारा आहे. भारत देश साक्षर होईल तेव्हा देशाचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. ‘पार्टी दणाणली’ हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे.

‘सलमान सोसायटी’ या मराठी सिनेमात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारा गौरव मोरे एका अनोख्या परंतु महत्त्वपूर्ण भूमिकेत मनोरंजन करताना दिसणार आहे. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ही बच्चे कंपनी या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Salman Society: मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’ च पार्टी दणाणली धमाकेदार गाणं प्रदर्शित

बाल कलाकार पुष्करने या अगोदर ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘बाजी’, ‘रांजण’, ‘चि .व चि .सौ. का’, ‘फिरकी’ आणि ‘टी. टी. एम. एम’ झोंबीवली सिनेमात अभिनय केला आहे तर शुभम मोरेने हिंदी सिनेमा ‘रईस’मध्ये बालपणीच्या शाहरुख खानची म्हणजेच किंग खानची भूमिका साकारली आहे. तसेच ‘हाफ टिकिट’, ‘फास्टर फेणे’ जर्नी सारखे उत्तम मराठी सिनेमा केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने ‘हाफ टिकिट’, ‘ताजमहल’ आणि ‘येरे येरे पावसा, माउली’मध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

या मराठी सिनेमात उपेंद्र लिमये पाहुण्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. तसेच सिनेमामध्ये देवकी भोंडवे, वनिता खरात, नम्रता संभेराव, कुणाल मेश्राम, शेषपाल गणवीर आदि कलाकार मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.’पार्टी दणाणली’ हे गाणे चाहत्यांना चांगलाच भुरळ पाडेल हे नक्की आहे. आता या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. सिनेमाच्या ट्रेलर देखील लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. 17 नोव्हेंबर 2023 दिवशी हा सिनेमा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज राहणार आहे.

Tags

follow us