Gaurav More: मराठी सिनेमाच्या दुरवस्थेबद्दल गौरव मोरेनी व्यक्त केली खंत

Gaurav More: मराठी सिनेमाच्या दुरवस्थेबद्दल गौरव मोरेनी व्यक्त केली खंत

Gaurav More On Marathi Movie Audience: मराठी सिनेमाच्या (Marathi Movie) दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच जबाबदार आहे. इतर प्रादेशिक भाषेत येणारे सिनेमा मात्र सुपरहिट होत असतात. त्या ठिकाणची स्थानिक कलावंत एका रात्रीमध्येच सुपरस्टार होत आहेत. याचे कारण त्या त्या भाषेतील लोक आपल्या भाषेतील सिनेमा आवर्जून पाहत असतात. परंतु मराठी सिनेमा आपलेच मराठी प्रेक्षक पाहत नसल्याने, आज मराठी कलावंत म्हणून वाईट वाटते.” अशी खंत हास्यजत्रा कॉमेडी कलाकार गौरव मोरेने (Gaurav More) व्यक्त केली.

शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अमोल मोहन निरगुडे यांच्या “झटपट करोडपती कसे व्हावे” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डोंबिवलीमध्ये पार पडले आहे. त्यावेळी गौरव मोरे प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. त्यावेळी त्याने हे भाष्य केले आहे. यावेळी व्यासपीठावर शैलजा जोशी, रेखा गोखले, दिपाली काळे, सुहासिनी कुलकर्णी, अमोल निरगुडे, अश्विनी निरगुडे, प्रकाशक डॉ.संतोष राणे इत्यादी मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती.

मराठी अभिनेते जेव्हा हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेमध्ये जेव्हा दुय्यम भूमिका करत असतात, तेव्हा आपलेच प्रेक्षक त्यांच्यावर सडकून टीका करत असतात, हे अयोग्य असल्याचे सांगून गौरव मोरे पुढे सांगितले आहे की, मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाही, ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. मराठी कलावंतांमध्ये अभिनयाची क्षमता एकदम जबरदस्त असून देखील अनेक वर्ष स्ट्रगल करण्यातच जात असतात. मराठी प्रेक्षक भाषेचा अभिमान बाळगून जाणीवपूर्वक सिनेमा बघतील, तेव्हाच मराठी सिनेमासृष्टीला सुगीचे दिवस येणार आहेत.

Shyamchi Aai Trailer: ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची तुफान पसंती

यावेळी गौरव मोरेच्या हस्ते “झटपट करोडपती कसे व्हावे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. डॉ.नाना भोंग यांच्या “साँच” या आत्मकथनाला “वि. स.खांडेकर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. यावेळी लेखक अमोल निरगुडे, अमित भावे, दिपाली काळे, प्रकाश चांदे यांची देखील भाषणे झाली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube