Download App

Gautami Patil : “मला लगीन कराव पायजे”, गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय? म्हणाली…

  • Written By: Last Updated:

Gautami Patil : सध्या सोशल मीडिया नृत्यांगणा स्टार गौतमी पाटीलचे (Gautami Patil) नाव कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर लोकप्रिय झाली आहे. आपल्या लावणीच्या डान्समुळे गौतमीने चाहत्यांना चांगलेच घायाळ करत असते. गौतमीचा डान्स बघायला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. आता नुकतचं एका झालेल्या मुलाखतीमध्ये गौतमीने पहिल्यांदा लग्नाविषयी मोठा गौप्यस्फोट केले आहे.

तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गौतमी पाटील म्हणाली,”माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. वडिलांचे लवकर निधन झालं, यानंतर घरी कोणीच पुरुष व्यक्ती नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीही कोणत्या पुरुषाबरोबर वैयक्तिक संबंध आला नाही. यामुळे घरामधील जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्याकरिता एकतरी पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे.


कसा जोडीदार हवाय? (Gautami Patil Wedding)

गौतमी पुढे म्हणाली,”मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण कोणत्याही परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला सोबती हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करणार आहे. आता मी २५ वर्षांची आहे, माझं लग्न झाले नाही. पण लवकरच मी लग्नबंधनामध्ये अडकण्याची माझी इच्छा आहे.


गौतमीवर एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरी देखील चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात राडा होत असतो. पण तरी देखील तरुण वर्ग तिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली दिसून येते. गौतमी पाटीलच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याला प्रत्येकालाच रस आहे. गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबद्दल आणि जोडीदाराविषयीच्या मोठा खुलासा केला आहे.

Kangana Ranaut: “त्या चाचा चौधरीने सर्वांसमोर…”, कंगना रणौतने करण जोहरला सुनावलं

गौतमी पाटील आपल्या अश्लील डान्सच्या हावभाव करत असल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना मोठ्या प्रमाणात वेड लावले आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असली, तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर जास्त फोकस केला आहे. गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us