Kangana Ranaut: “त्या चाचा चौधरीने सर्वांसमोर…”, कंगना रणौतने करण जोहरला सुनावलं

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T104551.199

Kangana Ranaut: सध्या बॉलिवूडमध्ये करण जोहरचे (karan johar ) बॉलिवूड (Bollywood) स्टार्सबरोबर चांगलीच शाब्दिक चकमक रंगलेली दिसतेय. करण जोहर आणि कंगना रानौत (Kangana Ranaut ) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) करिअर संपवायचं होतं, असं म्हणत असलेला करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ बघून कंगना रणौत करणला चांगलच सुनावलं आहे. यानंतर करणने एक क्रिप्टीक पोस्ट करत कंगनाला प्रतिउत्तर दिले होते. यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

“मला अनुष्का शर्माचे करिअर पूर्णपणे संपवायचं होतं. यामागचं कारण म्हणजे जेव्हा आदित्य चोप्राने मला तिचे फोटो दाखवले होते तेव्हा मी सांगितले होते की, अनुष्काला चित्रपटाकरिता साईन करण्याची काही गरज नाही. कारण तेव्हा माझ्या ओळखीत असलेल्या एका अभिनेत्रीला आदित्यने साईन करावं, अशी माझी इच्छा होती”, असं करण म्हणाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


यानंतर करणच्या या व्हिडीओवर “या चाचा चौधरी फक्त हे एकच काम आहे”, असं कंगना करणचा व्हिडीओ स्टोरीला शेअर करत म्हणाली होती. अशी प्रतिक्रिया कंगना रणौतने दिली आहे.

Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली?

करणने शेअर केलेली पोस्ट

“लगा लो इल्जाम….हम झुकने वालों में से नहीं, झूठ का बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं, जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे, हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं।” असे करण जोहरने पोस्टमध्ये लिहलेले होते.

यावर कंगना रणौत काय म्हणाली?

“एक काळ होता जेव्हा चाचा चौधरी एलाइट नेपो माफियांसोबत मिळून माझा नॅशनल टीव्हीवर अपमान करत होता. कारण मला इंग्रजी बोलता येत नव्हते. आज याची हिंदी बघून विचार आला की आता तर फक्त तुझी हिंदी सुधारली आहे, पुढे नेमकं काय होणार ते,” असं कंगना रणौत म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रामवर ही स्टोरी पोस्ट केली आहे. अशाप्रकारे कंगना आणि करण मधील वाद थांबण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. दोघेही एकमेकांची बाजू मांडताना एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

Tags

follow us