Gautami Patil : सगळं काही असूनही खूश नाही…गौतमी पाटील असं का म्हणाली?

माझ्याकडे आज सर्व काही आहे, पण मी खूश नसल्याचं एका मुलाखतीदरम्यान नृत्यांगणा गौतमी पाटीलने सांगितलं आहे. काही दिवसांपासून सारख्या वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली गौतमी पाटीलच्या वक्तव्याने तिच्या चाहत्याने गौतमी खूश का नाही? हा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला… मुलाखतीत बोलताना गौतमी पाटील म्हणते आधीची गौतमी अन् आत्ताची गौतमी […]

Gautami Patil

Gautami Patil

माझ्याकडे आज सर्व काही आहे, पण मी खूश नसल्याचं एका मुलाखतीदरम्यान नृत्यांगणा गौतमी पाटीलने सांगितलं आहे. काही दिवसांपासून सारख्या वादाच्या भोवऱ्यात सापडत असलेली गौतमी पाटीलच्या वक्तव्याने तिच्या चाहत्याने गौतमी खूश का नाही? हा प्रश्न पडला आहे.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट! राज्यातील अनेक भागांत निसर्गाने मूड बदलला…

मुलाखतीत बोलताना गौतमी पाटील म्हणते आधीची गौतमी अन् आत्ताची गौतमी पाटील खूप वेगळी आहे. अर्थात आधीच्या आयुष्यासारखं आता जीवन नाही. घराच्या जबाबदारी जेव्हापासून उचलली तेव्हापासून मी माझं आयुष्य विसरुन गेल्याचं गौतमीने सांगितलंय.

तसेच ज्यावेळी मला प्रसिद्धी नव्हती त्यावेळी मला कसलं टेन्शन नसायचं. आयुष्यात अजूनही खूप काही गोष्टी मला शिकायच्या आहेत. मी आयुष्यात ज्या गोष्टींना सामोरं गेलीय, त्यानंतर मला लोकं पुढे जाण्यासाठी बळ देत आहेत. आधी मैत्रीणींसोबतचं खेळणं, कुदणं आता या सर्व गोष्टी करता येत नाहीत, त्यामुळे आज सर्व काही आहे पण आधीच्या आयुष्यातल्या त्या गोष्टी नसल्याने खूश नसल्याचं तिने सांगितलं आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शरयू तीरावर महाआरती, समारोप करतांना म्हणाले….

त्यावेळी जवळ काहीही नव्हतं पण तरीही मी खुश असायची आता माझ्याकडं सगळं काही आहे तरीही मी खूश नाही. आयुष्यात सर्वकाही मिळत नसतं, असंही तिने सांगितलं आहे. यावेळी गौतमी पाटीलला कोणाची भीती वाटते, हेही स्पष्ट केलंय. गौतमीला फक्त आईची खूप भीती वाटत असल्याचं तिने सांगितलंय.

दरम्यान, पुढील काळात गोरगरीब मुला-मुलींसाठी गौतमी डान्स अॅकडमी सुरु करणार असून ज्यांना परिस्थितीला सामोरं जात प्रसिद्धी मिळवलीय तशी परिस्थिती कोणावरही येऊ नये, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.

पेट्रोल-डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 8 टँकरसह 2 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. गौतमीवर टीका-टिपण्या करण्याचं सत्र अद्यापही सुरुच असून लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, या शब्दांत तमाशाकर्मी रघुवीर खेडकर दिला आहे.

१०० कलावंतांचा तमाशाचा फड असूनही काही गावांत दोन लाखही दिले जात नाहीत. मात्र, चार मुलींचा ताफा असलेल्या गौतमीच्या कार्यक्रमाला पाच-पाच लाखांची बिदागी मिळतेय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय.

Exit mobile version