Download App

इफ्फी मध्ये ‘घरत गणपती’ चित्रपटाचा गौरव; नवज्योत बांदिवडेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित

  • Written By: Last Updated:

Gharat Ganapati wins IFFI Navjot Bandivdekar awarded : गोव्यातील 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ‘भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार’ विभागात ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी (Marathi Movie) दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचं स्वरूप (Gharat Ganapati wins IFFI award) आहे. गोवा पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला.

‘पहिल्याच चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि पुरस्काराची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर (Navjot Bandivdekar) यांनी व्यक्त केली. एक छान कौटुंबिक कथा आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले. त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय’, याचा अभिमान असल्याचंही दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सांगतात.

VIDEO : ‘आम्हाला माफ करा महाराज’…तरूणीनं चित्रपटगृहात फोडला टाहो

गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी)भारतीय फिचर चित्रपट पुरस्काराच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा विभाग जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत होते. पुरस्काराच्या या स्पर्धेत ‘ घरत गणपती’ चित्रपटाने आपली मोहोर उमटवली.

“एक दिवसांत ९.९९ लाख मतदान कसं वाढलं?”, पटोलेंनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं

संपूर्ण भारतातील तरुण चित्रपट निर्मिती प्रतिभेला ओळखण्यासाठी, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इफ्फीच्या यंदाच्या आवृत्तीसाठी भारतीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक नव्याने सुरु केलाय. 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा भारतीय फिचर पुरस्कारांच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकिय पदार्पण हा विभाग जाहिर केला आहे. त्यात मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मारलेली बाजी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. प्रशस्तिपत्रक, 5 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे नवज्योत यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

follow us