Download App

गोविंदा अन् सुनिताचा खरंच घटस्फोट होणार? वकिलांनी एकाच वाक्यात दिलं उत्तर

यात काही नाही. सर्व काही सेटल होत आहे. लोकांकडून फक्त जुन्या गोष्टींना चर्चेत आणले जात आहे.

Govinda Sunita Ahuja Divorce Rumours : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता (Govinda Sunita Ahuja Divorce Rumours) यांच्या संसाराला कुणाची तरी नजर लागली आहे कारण मागील दोन ते तीन दिवसांपासून दोघांत घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. खरंच गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांचा घटस्फोट होणार का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. याआधी सुनिता अहुजा यांनी गोविंदावर व्यभिचार, क्रूरता आणि चीटिंग केल्याचा गंभीर आरोप केला होता. आरोप करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज देखील दिला होता. परंतु या प्रकरणात आता अभिनेता गोविंदा यांचे वकील यांनी या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांनी एनडीटीव्हीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांना गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चा संबंधी विचारण्यात आले. या चर्चांवर वकील बिंद्रा यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. बिंद्रा म्हणाले, यात काही नाही. सर्व काही सेटल होत आहे. लोकांकडून फक्त जुन्या गोष्टींना चर्चेत आणले जात आहे. पब्लिकेशन सूत्रांनी हे देखील सांगितले की आता लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे. त्यावेळी तुम्हाला सर्वजण एक साथ असल्याचे दिसतील.

Govinda : गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, गोळी लागल्यानंतर पहिल्यांदा समोर आला अभिनेता

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आऊटर फ्लायच्या एका रिपोर्टमध्ये सुनीता अहुजा यांनी गोविंदा यांच्या विरोधात वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता. हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या अंतर्गत व्यभिचार, क्रूरता आणि परित्याग यांचा हवाला देण्यात आला होता. डिसेंबर 2024 मध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत दावा करण्यात आला होता, की गोविंदा सुनावणीसाठी सातत्याने गैरहजर राहतो. न्यायालयाने शेड्युल केलेल्या काउन्सलिंग सेशनमध्येही त्याने सहभाग घेतला नाही. परंतु त्याची पत्नी सुनीता ही नेहमी या सुनावणीसाठी हजर राहत होती.

याआधीही घटस्फोटाच्या चर्चा

सुनिता आणि गोविंदा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आजच सुरू झाल्या असे नाही तर याआधी देखील अशा चर्चा झाल्या होत्या. या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्यात सातत्याने मतभेद होत आहेत. यामागे दोघांचेही वेगवेगळे लाइफस्टाईल हे कारण देण्यात आले होते. तसेच दोघेही आता एकमेकांपासून विभक्त होणार आहेत असा दावा करण्यात आला होता. यामध्ये असेही म्हटले होते की गोविंदाचे एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर आहे आणि या कारणामुळे सुनीता अहुजा आणि गोविंदा यांच्यात काडीमोड होणार असल्याचे या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते.

यानंतर त्यांच्या वकिलांनी सांगितले होते की दोघांनीही सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असला तरी आता दोघेही पुन्हा एकत्र येत आहेत. गोविंदाचे फॅमिली फ्रेंड ललित बिंदल यांनी सांगितले की गोविंदा आणि सुनीता यांचे नाते घट्ट आहे आणि ते असेच पुढेही राहील.

20 दिवस मंत्र्याची मुलगी मोलकरणी बनून राहत होती गोविंदाच्या घरात, भांडं फुटलं अन् घडलं असं काही  

follow us