फिटनेससाठी ओळखला जाणाऱ्या Gurmeet Choudhary ची राष्ट्रीय स्प्रिंटिंग स्पर्धेसाठी निवड

Gurmeet Choudhary हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्यानंतर आता गुरमीतची राष्ट्रीय स्प्रिंटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

फिटनेससाठी ओळखला जाणाऱ्या Gurmeet Choudhary ची राष्ट्रीय स्प्रिंटिंग स्पर्धेसाठी निवड

Gurmeet Choudhary

Gurmeet Choudhary Choose for National Sprinting competition : अभिनेता गुरमीत चौधरी ( Gurmeet Choudhary ) हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. नुकताच तो चर्चेत आला आहे. त्याच्या कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजमुळे. या वेब सिरीजचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ही वेब सिरीज अमित खान यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे.

कतरच्या खेळाडूंची चिटींग अन् भारताचं स्वप्न भंगलं; ‘सोशल’वरील ‘त्या’ ट्रेंडचं सत्य काय?

त्यानंतर आता गुरमीतसाठी आणखी एक खास बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गुरमीतची राष्ट्रीय स्प्रिंटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल आपला आनंद व्यक्त करताना गुरमीत म्हणाला की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, राष्ट्रीय स्प्रिंटिंग स्पर्धेसाठी माझी निवड झाली आहे. तसेच कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजची तयारी करताना मी अत्यंत कठोर मेहनत घेतली रात्रंदिवस एक करत ट्रेनिंग घेतलं.

Maharashtra Politics : लोकसभेनंतर फासे फिरले; राज्यातील आमदारांना मंत्रिपदात ‘नो इंट्रेस्ट’

त्यानंतर आता सिरीजचा टीझर पाहून मला अभिमान वाटत आहे. हे सगळं होऊ शकलं ते केवळ मेहनत, त्याग आणि सातत्य यामुळे. तसेच कमांडर या शब्दातच एक जादू आहे. त्याचबरोबर मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी जात असल्याने सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. असं देखील यावेळी गुरमीत म्हणाला. पुढे तो असंही म्हणाला की आतापर्यंतचा माझा प्रवास तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे शक्य झाला आहे. त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. तसेच यावेळी त्याने त्याचे कोच सदाशिव तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार आणि कमांडर करण सक्सेना च्या सर्व टीमचे आभार मानले आहेत.

Exit mobile version