कतरच्या खेळाडूंची चिटींग अन् भारताचं स्वप्न भंगलं; ‘सोशल’वरील ‘त्या’ ट्रेंडचं सत्य काय?

कतरच्या खेळाडूंची चिटींग अन् भारताचं स्वप्न भंगलं; ‘सोशल’वरील ‘त्या’ ट्रेंडचं सत्य काय?

Fifa World Cup Qualifiers : फीफा वर्ल्डकप क्वालिफायरच्या सामन्यात कतर (Fifa World Cup) विरोधात भारताचा पराभव झाला. या सामन्यात भारतीय (IND vs Qatar) संघाचा 2-1 असा पराभव झाला. दोहा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक गोल मात्र प्रचंड वादात सापडला आहे. कतरच्या खेळाडूंकडून हा गोल केला गेला. यानंतर मैदानात मोठा वाद निर्माण झाला. भारतीय खेळाडूंनी याचा विरोध केला. याच कारणामुळे भारत क्वालिफायर राऊंडमधून बाद झाला आहे. वर्ल्डकप अंतिम सामन्यात खेळण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा भंगलं आहे. या वादग्रस्त गोलचे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असून चिटींग हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

या सामन्यातील 73 व्या मिनिटाला कतरच्या युसूफ अयमनने एक गोल केला. हा गोल वादात सापडला. कारण चेंडू लाइनच्या बाहेर निघून गेला होता. हे व्हिडिओतही स्पष्टपणे दिसत आहे. तरी देखील डिफेंडरने चेंडूला पुन्हा आत घेत युसूफकडे पास केला. यानंतर युसूफने गोल केला. ऑन फिल्ड अंपायरने सुद्धा हा गोल योग्य असल्याचा निर्वाळा दिला. हा गोल होण्याआधी दोन्ही संघांचा स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता. यानंतर कतरने दोन गोल करत विजयी आघाडी घेतली.

T20 WC 2024: वर्ल्डकप सामन्यातील पहिलीच सुपर ओव्हर; नामिबियाचा ओमानवर थरारक विजय

ज्यावेळी रेफरीने हा गोल बरोबर असल्याचे घोषित केले त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंचा संयम सुटला. यानंतर रेफरी किम वू सुंग यांनी लाइनमन बरोबर चर्चा केली. यानंतर गोल बरोबर होता असे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत ऑन फिल्ड रेफरीचा निर्णय योग्य मानला गेला. या वादग्रस्त निर्णयाचा भारतीय संघाला मात्र मोठा फटका बसला आणि वर्ल्डकप खेळण्याचं संघाचं स्वप्न भंगलं.

या सामन्यात भारताने कतरच्या खेळाडूंना गुंतवून ठेवलं होतं. मात्र युसूफने शेवटच्या काही मिनिटांत गोल करत आघाडी घेतली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की फुटबॉल गोलपोस्टच्या पलीकडे गेला होता. त्यानंतर कतरच्या खेळाडूंनी बॉल आत घेत गोलपोस्टच्या दिशेने ढकलत गोल केला. या वादग्रस्त गोलनंतर भारतीय खेळाडूंचा हिरमोड झाला. सामन्यातील त्यांची लय बिघडली. यानंततर 85 व्या मिनिटाला कतरने आणखी एक गोल करत विजयी आघाडी घेतली. यानंतर कतरने सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला. या पराभवानंतर आता भारतीय संघाला वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करता येणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube