Vijay Kadam Passed Away: ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (शनिवार) पहाटे निधन झाले. (Vijay Kadam Death) ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. (Vijay Kadam Passed Away) विजय हे गेले दीड वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. परंतु आज पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सध्या व्यक्त केली जात आहे. (Vijay Kadam) त्यांच्या पार्थिवावर आज अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे अंधेरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
1980 ते 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय अभिनेते होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनयाने मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडणारे विनोदवीर कलाकार होते. 1980 ते 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय अभिनेते होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनयाने मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडणारे विनोदवीर कलाकार होते. अनेक मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. काही काळापूर्वी त्यांनी ‘ती परत आलीये’ या मालिकेत ‘बाबुराव तांडेल’ ही व्यक्तिरेखा साकारली होती.
नाटक आणि मालिकांमधूनही काम
‘टूरटूर’, ‘सही दे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून विजय कदम यांनी कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. अनेक मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. काही काळापूर्वी त्यांनी ‘ती परत आलीये’ या मालिकेत ‘बाबुराव तांडेल’ ही व्यक्तिरेखा साकारली होती.
हे चित्रपट गाजले
गाजलेल्या चित्रपटांची नावे घ्यायची झाल्यास आनंदी आनंद (1987), तेरे मेरे सपने (1996), देखणी बायको नम्याची (2001), रेवती (2005), टोपी घला रे (2010), ब्लफमास्टर (2012), भेट तुजी माजी (2013) आणि मंकी बात (2018) या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.