Haddi Trailer: धडाकेबाज ॲक्शन अन् ड्रामा… नवाजुद्दीनच्या ‘हड्डी’ चा ‘भयानक’ ट्रेलर प्रदर्शित

Haddi trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा हड्डी (Haddi) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या सिनेमा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील नवाजुद्दीनच्या डायलॉग्सनं अनेकांचे चांगलेच लक्ष वेधले असल्याचे बघायला मिळाले आहे. हड्डी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर अनुराग कश्यप […]

Haddi Trailer

Haddi Trailer

Haddi trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. लवकरच त्याचा हड्डी (Haddi) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या सिनेमा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील नवाजुद्दीनच्या डायलॉग्सनं अनेकांचे चांगलेच लक्ष वेधले असल्याचे बघायला मिळाले आहे.

हड्डी या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) देखील असल्याचे बघायला मिळणार आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला नवाजुद्दीन हा एका ट्रान्सजेंडरच्या लूकमध्ये बघायला मिळत आहे. नवाजुद्दीने हड्डी या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ‘सूड कधी इतका थंड दिसला आहे का? हड्डी येत आहे, सूडाची कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी’


तसेच या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप यांच्याबरोबर इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांची मुख्य भूमिका साकारली आहे. हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ दिवशी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे, तर झी स्टुडिओनं या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Nargis Fakhri: तलुबाज कास्टमध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी !

या सिनेमात अॅक्शन, ड्रामा बघायला मिळणार आहे, असा अंदाज या सिनेमाचा ट्रेलर बघितल्यानंतर लावला जाऊ शकतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो, ठाकरे, ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमानं आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. नवाजुद्दीनच्या अभिनयाचं अनेक जण कायम कौतुक करत असताना दिसून येत असतात. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीचा’टिकू वेड्स शेरू’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हड्डी या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Exit mobile version