Nargis Fakhri: तलुबाज कास्टमध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी !

Nargis Fakhri: तलुबाज कास्टमध्ये इसाबेलच्या भूमिकेत दिसणार नर्गिस फाखरी !

Nargis Fakhri: बाहेर देशातून भारतात येऊन बॉलीवूड सेलिब्रिटी बनणं ही काही नवी गोष्ट नाही आहे. अशीच एक अभिनेत्री नरगिस फाखरी. ती मूळची अमेरिकेची पण सध्या भारताच्या सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. ( Social media)  नरगिस फाखरी ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने भारतीय चित्रपट क्षेत्रात काम करते. हिंदी चित्रपटातील तिची पहिली भूमिका 2011 च्या रोमँटिक ड्रामा रॉकस्टारमध्ये होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)


या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘रॉकस्टार’ आणि ‘मैं तेरा हिरो’ सारख्या आपल्या चित्रपटांनी मन जिंकणारी सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री नरगिस फाखरी ही तलुबाज या वेब सिरीजद्वारे तिचे ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

नरगिस तिच्या नवीन अवतारात अफलातून दिसत आहे. इसाबेलच्या रूपात तिच्या अप्रतिम दिसण्याने तिच्या चाहत्यांचा उत्साह पुन्हा एकदा जागा झाला आहे. तिच्या अभिनयाची जादू बघण्यासाठी ऑन-स्क्रीन पुन्हा एकदा साक्षीदार होण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या सीरिज च्या शूटिंगने नरगिसला वाराणसी या मोहक शहरात घेऊन गेले आहे.तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे नर्गिस सेटवरच्या तिच्या प्रवासाची पडद्यामागील झलक शेयर केली आहे. नरगिसच्या ओटीटी पदार्पणासाठी सगळेच उत्सुक होत असल्याचे बघायला मिळत आहे.

Ravi Jadhav: रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘छोटेशी व्यक्तीरेखा…’

2011 मध्ये इम्तियाज अलीच्या म्युजिकल रोमँटिक ड्रामा रॉकस्टारमध्ये नर्गिस मुख्य भूमिकेत दिसली. हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी संगीतकार आणि गायकाचा सामान्य जीवन ते आंतरराष्ट्रीय स्टार बनण्याचा प्रवास दाखवला आहे. यामध्ये नरगिसला काश्मिरी पंडित दाखवले गेले आहे. काश्मिरी पंडितांचे लग्न दाखवणारा रॉकस्टार हा भारतातील पहिला चित्रपट होता आणि नर्गिसने या चित्रपटात श्रीमंत मुलगीची भूमिका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube