Scoop : हंसल मेहताच्या ‘स्कूप’ बुसानच्या ग्लोबल ओटीटी पुरस्कारांमध्ये दाखल

Hansal Mehta: हंसल मेहता यांची नेटफ्लिक्सवरील गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘स्कूप’ या वेब सीरिजला (Scoop Web series) 2023 चा एशिया कंटेंट अवॉर्ड्स आणि ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्ससाठी (Global OTT Awards) नामांकने मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय (International) चित्रपट महोत्सवात या मानाच नामांकन मिळालं आहे. हे नामांकन ओटीटी प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग मनोरंजनाच्या जगात उल्लेखनीय म्हणून ओळखलं जात. हंसल मेहताच्या स्कूपने […]

Scoop

Scoop

Hansal Mehta: हंसल मेहता यांची नेटफ्लिक्सवरील गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘स्कूप’ या वेब सीरिजला (Scoop Web series) 2023 चा एशिया कंटेंट अवॉर्ड्स आणि ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्ससाठी (Global OTT Awards) नामांकने मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय (International) चित्रपट महोत्सवात या मानाच नामांकन मिळालं आहे.

हे नामांकन ओटीटी प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग मनोरंजनाच्या जगात उल्लेखनीय म्हणून ओळखलं जात. हंसल मेहताच्या स्कूपने प्रतिभावान करिश्मा तन्ना हिच्यासाठी “सर्वोत्कृष्ट आशियाई मालिका” आणि “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री” या दोन प्रमुख श्रेणींमध्ये नामांकन मिळवले. “स्कूप” या शोमध्ये करिश्मा तन्ना मुंबईतील एका वृत्तपत्रासाठी काम करणारी प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर जागृती पाठकची भूमिका साकारत आहे. तिचा प्रतिस्पर्धी जयदेब सेन यांच्या हत्येचा आरोप तिच्यावर होतो तेव्हा ही कथा रंजक बनते आणि ती एक मोठी बातमी बनते.

हंसल मेहता ट्विटर वर व्यक्त होतात “@NetflixIndia वर #Scoop ACA आणि ग्लोबल OTT पुरस्कारांसाठी नामांकन. – सर्वोत्कृष्ट आशियाई मालिका – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री @KARISHMAK_TANNA संपूर्ण टीमसाठी मोठा सन्मान. @mrunmayeelagoo @MatchboxShots” करण्यात आला आहे. मेहता यांच्या ट्विटमध्ये कृतज्ञता आणि नम्रता दिसून येते कारण त्यांनी कबूल केले की हे यश संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा पुरावा आहे. ” स्कॅम 2003 – द तेलगी स्टोरी” या त्याच्या नव्या व्हाईट-कॉलर क्राईम वेब सीरिज च सर्वत्र कौतुक देखील होतंय.

Jawan चित्रपटाच्या कमाईत घसरण; ६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

या वेबसिरीज प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर जिग्ना व्होरा यांची आहे. जी एका वरिष्ठ क्राईम रिपोर्टरच्या हत्येप्रकरणी तब्बल नऊ महिने भायखळा तुरुंगात टाकले जाते. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा एक फोन आल्यानंतर जर्नलिस्ट जिग्ना व्होराचं आयुष्य कसं बदलतं? हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. ‘स्कूप’ ही वेबसिरीज क्राईम रिपोर्टर ‘जिग्ना व्होरा जर्नलिस्ट’च्या जीवनावर आधारित आहे. ही वेब सीरिज जिग्ना व्होरा यांनी लिहिलेल्या Behind Bars in Byculla: My Days in Prison या पुस्तकावर आधारित आहे. वरिष्ठ गुन्हे पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर छोटा राजनसोबत कट रचल्याप्रकरणी जिग्ना व्होरा हिला २०११ मध्ये अटक करण्यात आली होती.

स्कूप या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्नानं जागृती पाठक ही भूमिका साकारली आहे. करिश्मानं या वेब सीरिजमध्ये उत्तम अभिनय केला आहे. स्कॅम 1992 या वेब सीरिजमुळे हंसल मेहता यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. स्कॅम 1992 प्रमाणेच स्कूप या वेब सीरिजचे देखील हंसल मेहता यांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे.

Exit mobile version