Happy Birthday Kriti Sanon: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आज (२७ जुलै) तिचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रितीचा जन्म २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्लीमध्ये झाला आहे. मनोरंजन क्षेत्राशी कोणताही संबंध नसताना क्रिती सेनन आज बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली असल्याचे पाहायला मिळत आहे. क्रितीने तिच्या हटके अदाने अभिनयाची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केल्याचे पाहायला मिळाले आहे.
क्रिती सेननला तिच्या अभिनयाबरोबर हटके स्टाईलसाठी पसंती मिळत असते. ‘हिरोपंती’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याचे पाहायला मिळाले आहे, तरी ती अगोदरपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेत्री क्रिती सेननचा जन्म नवी दिल्लीत झाला. तिचे वडील राहुल सेनन हे सीए असल्याची माहिती आहे. तर, तिची आई गीता सेनन दिल्ली विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. एवढेच नव्हे तर क्रितीने स्वतः इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्याचे आपल्याला माहिती आहे.
तसेच तिने नोएडा येथील कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. क्रिती सेनन एक कथ्थक नृत्यांगना देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ नृत्यचं नाही तर, क्रिती ही राज्यस्तरीय बॉक्सर देखील आहे. परंतु नंतरच्या काळात तिने अचानक फिल्मी दुनियेमध्ये एन्ट्री करण्याचा निर्णय हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. क्रिती सेननने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ सुपरस्टार महेश बाबूबरोबर केली होती. तिचा पहिला सिनेमा तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर ‘नेनोक्कडाइन’ हा होता.
या सिनेमासाठी क्रिती सेननचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु या सिनेमातून तिला फारशी ओळख मिळू शकली नाही. यानंतर क्रिती सेनन शब्बीर खानच्या ‘हिरोपंती’मध्ये टायगर श्रॉफबरोबर झळकल्याचे पाहायला मिळाले आहे. हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा सुपरहिट ठरला होता. ‘हिरोपंती’ हा सिनेमा हिट झाला आणि क्रिती सेननला मनोरंजन विश्वामध्ये मोठी ओळख मिळाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर ती बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सिनेमामध्ये हटके अंदाजात दिसली आहे.
Gadar 2 Trailer: बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गदर 2’ चा ट्रेलर प्रदर्शित
क्रितीने तिच्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, तिला तिच्या पहिल्या रॅम्प वॉकच्या दरम्यान झालेल्या चुकीमुळे खूपजण झापल्याचे सांगितले आहे. त्यावेळी अभिनेत्री चक्क रॅम्पवरच रडल्याचे देखील पाहायला मिळाले होते. तिने तिचा पहिला रॅम्प शो केला तेव्हा, कोरिओग्राफीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचे पाहायला मिळालं. यामुळे कोरिओग्राफर तिच्यावर खूपच चिडल्याचे बघायला मिळाले आहे.