Happy Birthday Nagarjuna: मनोरंजन क्षेत्रातील सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna Birthday) आज (२९ ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहे. केवळ साऊथ मनोरंजन क्षेत्रात बनत असलेल्या सिनेमामध्येच नाही, तर नागार्जुनने आपल्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड (Bollywood) हटके सिनेमा केले आहेत. जे आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. परंतु बॉलिवूडमध्ये काम करत असताना नागार्जुन एका सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. नागार्जुन जिच्या सौंदर्यावर फिदा झाला, ती अभिनेत्री तब्बू (Tabu) होती. एकेकाळी नागार्जुन आणि तब्बूच्या नात्याची बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये जोरदार चर्चा रंगली होती.
सिनेमाच्या सेटवरून सुरू झालेली ही प्रेमकहाणी काही वर्षांमध्येचं त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला. नागार्जुन आणि तब्बू यांची पहिली भेट ‘निन्ने पेल्लादाता’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. दोघेही केवळ कामानिमित्त भेटत असले, तरी त्यांच्यामध्ये हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात होत चाले होते. यानंतर दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा नागार्जुन आणि तब्बूचं अफेअर सुरू झालं, तेव्हा अभिनेत्याच्या बायकोला याची काहीच माहिती नव्हती. दोघांनी खूप दिवस एकमेकांना गुपचूप डेट करत असल्याची चर्चा होती.
परंतु एका मुलाखतीच्या दरम्यान तब्बूने नागार्जुनयाबरोबर अफेअरची कबुली दिली होती. नागार्जुनबरोबर माझे नाते खूप खास असल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते. मी आणि तो एकमेकांच्या खूप जवळ आल्याचे देखील तिने सांगितले होते. नागार्जुन आणि तब्बूने ‘आविदे मां आवडा’, ‘निन्ने पेल्लादथा’ आणि ‘सिसिंद्री’ या हटक्या सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमामध्ये एकत्र काम करत असताना दोघांमधली ही जवळीक आणखीनच वाढत जात होती.
Jawanच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग किंग खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!
मुंबईमध्ये काम करणाऱ्या तब्बूने नागार्जुनच्या जवळ जाण्यासाठी तो राहत असलेल्या शहरामध्ये म्हणजेच हैदराबादमध्ये एक घर देखील विकत घेतले होते. नागार्जुनचे देखील तब्बूवर खूप प्रेम होते. परंतु अभिनेता अगोदरच विवाहित होता आणि त्याला त्याच्या बायकोला देखील घटस्फोट द्यायचा नव्हता. तब्बूने नागार्जुनला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फेल ठरला गेला. नागार्जुनच्या या जिद्दीमुळे तब्बूने हे नाते लवकरच संपवणे योग्य ठरवले. तब्बू ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वात सुंदर आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे यामध्ये काहीच शंका नाही. परंतु नागार्जुनबरोबर नाते संपुष्टात आल्यावावर तब्बूने सिंगल राहणेच पसंत केले. अभिनेत्री तब्बू आज देखील अविवाहित रहिली आहे.