Happy Birthday Priya Bapat: मराठी सिरीयल, नाटक आणि सिनेमा अशी तिन्ही क्षेत्रामध्ये गाजवल्यानंतर हिंदी मनोरंजन विश्वामध्ये पाऊल ठेवून डिजिटल प्लॅटफॉर्म गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). टीव्ही सिरीयलमधून प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचलेली प्रिया सगळ्याच चाहत्यांची खूप लाडकी आहे. (Social media) केवळ प्रियाच नाही तर उमेशबरोबर तिची जोडी देखील चाहत्यांना चांगलीच पसंत येत असते. (Happy Birthday Priya Bapat) पडद्यावर गाजलेली ही जोडी खऱ्या आयुष्यामध्ये देखील एकमेकांचे साथीदार आहे.
तब्बल ६ वर्षांच्या नात्यानंतर उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट यांनी लग्न बंधनात अडकले होते. तसेच लग्नानंतर देखील दोघांनी अनेकवेळा एकत्र काम केल्याचे बघायला मिळते. अभिनेत्री प्रिया बापट ही मुळची मुंबईची.. प्रियाचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ दिवशी मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. प्रियाने सोफिया कॉलेजमधून आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असल्याने प्रियाने मराठी रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळवली. तसेच प्रियाने अनेक मराठी नाटक आणि हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे.
‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व्यतिरिक्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे हिंदी सिनेमा तिने चांगलेच गाजवले आहे. या दरम्यान ती मराठी सिरीयलमध्येही लोकप्रिय झाली होती. प्रिया आणि उमेशची मैत्री तशी खूप जुनी होती. एकाच क्षेत्रामध्ये काम करत असल्याने त्यांची अधूनमधून भेट देखील होत असायची. प्रियाला कॉलेजमध्ये असल्यापासून उमेश खूप आवडत होता. मनोरंजन विश्वामध्ये सक्रिय झाल्यावर तिने आपलं करिअर घडवलं आणि उमेशबरोबर मैत्रीच रूपानंतर प्रेमात केलं. अर्थात यासाठी प्रियाने स्वतः पुढाकार घेतला होता. सुरुवातीला दोघांनी देखील एकमेकांना पुरेसा वेळ दिला.
Zareen Khan : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी, नेमकं प्रकरण तरी काय?
काही कालांतरानी एक दिवशी प्रियाने स्वतःच उमेशच्या समोर आपल्याला प्रेमाची कबुली दिली. यावर उमेशने मात्र थोडा वेळ घेत प्रियाच्या वाढदिवशी होकार देत तिला मोठा सरप्राईज दिल्याचे देखील बघायला मिळाले होते. या दोघांचे हे प्रेमप्रकरण तब्बल ६ वर्ष चाललं होत. यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नाच्या अगोदर दोघांनाही आपलं करिअर करायचं होतं. लग्नानंतर प्रिया आणि उमेशचा रोमँटिक मराठी सिनेमा ‘टाइम प्लीज’ चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमात उमेश कामत आणि प्रिया यांचे काही इंटिमेट सीन्स होते.
लग्नानंतर उमेशबरोबर असा ऑनस्क्रीन रोमान्स करत असताना प्रिया चांगलीच गोंधळायचे बघायला मिळले होते. हे सीन चित्रित करत असताना अनेक अडचणी समोर आल्या होत्या.परंतु नंतर दिग्दर्शकाने पुढाकार घेत समजावून सांगितल्यावर प्रिया या सीनसाठी तयार झाली होती. त्यांचा हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रिया आणि उमेश कामत यांच्या रोमान्सची जोरदार चर्चा देखील पाहायला मिळाली होती.