Download App

Randeep Hooda: लग्न तर खूप संस्कारांनी केलं अन् आता.. हनिमूनच्या फोटोंमुळे अभिनेता ट्रोल

Randeep Hooda-lin laishram Romantic: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने अलीकडेच लिन लैश्रामशी (-lin laishram) लग्न केले. सोशल मीडियावर (social media) त्याच्या लग्नाचे फोटोही समोर आले होते, ज्यामध्ये आसामी रितीरिवाजांनुसार अभिनेत्याने लग्न केल्याचे दिसले होते. आता हा अभिनेता लग्नानंतर सतत चर्चेत असतो. आता त्याने आपल्या पत्नीसोबत रोमँटिक शैलीत नवीन वर्ष 2024 चे स्वागत केले आहे. त्याने 2023 चा शेवटचा फोटो आणि 2024 चा पहिला फोटो शेअर केला आहे. हे त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. यावर चाहते खूप कमेंट करत अभिनेत्याला ट्रोल केलं आहे.


रणदीप हुड्डाने पत्नी लिन लैश्रामसोबत न्यू इयर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर हे शेअर करण्यासोबतच त्याने असेही लिहिले की, ‘2023 चा शेवटचा सूर्यास्त.’ त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की हे कपल केरळमधील कन्नूरला सुट्टीसाठी पोहोचले होते आणि तेथे त्यांनी नवीन वर्ष 2024 साजरे केले. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये लिन मोनोकिनीत दिसत आहे. ती पती रणदीपला किस करतानाही दिसत आहे. दरम्यान, अभिनेता सेल्फी घेण्यात व्यस्त आहे.

सोबतच दुसऱ्या फोटोमध्ये रणदीप आणि लिन एकत्र पोज देताना दिसत आहेत. यामध्ये दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळते. चाहत्यांंना ते खूप आवडत आहे. लिन लैश्राम आणि रणदीप हुड्डा यांचा विवाह 29 नोव्हेंबर 2023 रोजी इंफाळ, मणिपूर येथे झाला. यानंतर दोघांनी मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली.

नवीन वर्षात ज्युनियर एनटीआरची प्रेक्षकांना मोठी भेट; ‘या’ दिवशी मिळणार ‘देवरा’ची पहिली झलक

रणदीप हुड्डा यांचा वर्कफ्रंट: रणदीप हुडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तो लवकरच ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा टीझरही रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या भूमिकेतही हा अभिनेता चांगला दिसत आहे. लिन लैश्रामबद्दल बोलायचे झाले तर ती ‘टिक्की’ चित्रपटात दिसणार आहे.

follow us