पुन्हा एकदा चालणार हॅरी पॉटरची जादू ; टीव्ही सीरिजचा टीझर जारी

Harry Potter TV series announced : जगभरात हॅरी पॉटरच्या चाहत्यांची कमी नाहीये हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम, फसवणूक आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने जगभरातील सर्वच वयोगटातील करोडो प्रेक्षकांना आकर्षित केले होते. पिक्चरवरील हेच पाहून आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी निर्मात्यांकडून चाहत्यांना आणखी एक भन्नाट भेट दिली जाणार आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (60)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (60)

Harry Potter TV series announced : जगभरात हॅरी पॉटरच्या चाहत्यांची कमी नाहीये हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम, फसवणूक आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने जगभरातील सर्वच वयोगटातील करोडो प्रेक्षकांना आकर्षित केले होते. पिक्चरवरील हेच पाहून आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी निर्मात्यांकडून चाहत्यांना आणखी एक भन्नाट भेट दिली जाणार आहे.

हॅरी पॉटरवरील लोकांचे प्रेम पाहून निर्मात्यांनी चाहत्यांसाठी लवकरच हॅरी पॉटरवर एक टीव्ही मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हॅरी पॉटर आपल्या जादूच्या कांडीने विविध जादू करताना दिसून येणार आहे. एचबीओ मॅक्सतर्फे ही टीव्ही मालिका बनवली जात असून, या सीरिजचा टीझर आता समोर आला आहे.

Gulabrao Patil : बंडाला नऊ महिने झाले, आम्हाला छळण्यापेक्षा पक्षबांधणी करुन सरकार आणायचा विचार करा

टीझर जारी
नव्याने येणाऱ्या सीरिजसाठी HBO ने एक खास टीझर जारी केला आहे. या टीझरला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. निर्मात्यांनी हॅरी पॉटर टीव्ही मालिकेचा खास टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे.यामध्ये हॅरी पॉटरच्या टीव्ही मालिकेबद्दलच्या चर्चांना याद्वारे पूर्णविराम देण्याचे काम करण्यात आले आहे.

Exit mobile version