Gulabrao Patil : बंडाला नऊ महिने झाले, आम्हाला छळण्यापेक्षा पक्षबांधणी करुन सरकार आणायचा विचार करा
“आमच्या बंडाला आता नऊ महिने होऊन गेले. तो एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा” असा खोचक सल्ला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे.
काल एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद मध्ये एका कार्यक्रमात बोलताना गौप्यस्फोट केला. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असं एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन रडून सांगितलं होतं, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. ठाकरे यांच्या या दाव्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
कुणाल कामरा यांनी मोदी सरकारच्या नव्या आयटी कायद्याला कोर्टात दिलं आव्हान; कोर्टाने सरकारला सुनावलं
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की “आमच्या बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेले आहे. किती दिवस एकाच विषय लावून आम्हाला छळणार आहात? तेच तेच बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही. आता राज्याचे काही बघणार की नाही? तुम्हीही आम्हाला आता विसरा. खरंतर आता पक्षबांधणी करुन नव्याने सरकार कसं येईल याचा विचार केला पाहिजे, यासाठी प्रयत्न आता केला पाहिजे. तेच तेच पाहून लोकही कंटाळले असून टीव्ही पाहत नाहीत.”
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे व खासदार प्रियांका चतुर्वेदी या हैदराबाद विद्यापीठामध्ये एक दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय एजन्सीकडून अटकेची शक्यता होती. या भितीने ते मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला असे सांगत होते, असा गौप्यस्फोट ठाकरे यांनी केलाय आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, हिंदुत्व, काँग्रेसबरोबर ठाकरे का गेले असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, चाळीस लोक हे पैसेसाठी आम्हाला सोडून गेले होते. एकदिवस एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर आले होते. केंद्रीय एजन्सीकडून अटक होऊ शकते असे सांगून ते रडू लागले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.