उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray will not be CM again : गेल्या सात महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), निवडणूक आयोग आणि राज्यपालांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सगळा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) आपला निर्णय राखून ठेवा आहे. त्यामुळं कोर्टाच निर्णय कधी येणार आणि निर्णय काय लागणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे, असं भाकीत त्यांनी केलं.

नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप झाला होता. शिंदेच्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार हे अल्पमतात आलं. त्यामुळं राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन राज्यात नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. दरम्यान, हे शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असून शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका ठाकरे गटाने केली होती. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. फक्त सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे.

Infinite love : प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहत्यांनी सोनू सूदचे अडीच हजार किलो तांदळाचे काढले छायाचित्र

अशाचत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना फडणवीस यांनी मोठ भाष्य केलं. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येणं बाकी असतांना फडणवीसांनी सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावरील सुनावणीच्या युक्तीवादाचा आधार देत सांगिललं की, उध्दव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, ज्यांनी सुप्रीम कोर्टाची सुनावणी बघितली, त्यांच्या हे लक्षात आलं असेल की, उध्दव ठाकरे हे फ्लोअर टेस्टला सामोरे गेले नाहीत. त्यामुळं त्यांचं सरकार पुन्हा येऊ शकत नाही. मी स्वत: वकील आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांनी दिलेला राजीनामा रद्द करून त्यांना मुख्यमंत्री पदाच्य खुर्चीवर परत कसं आणून बसणार? नाहीच बसवणार. कोर्टातील त्यांची मागणी बघिलतं तरी तिचं होती.

फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्ल अंदाज वर्तवण चुकीचं आहे. पण, आमच्या भूमिकेमुळे आम्हाला असं वाटत की, सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्हाला योग्य असाच येईल. मी माझं भाकीत सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोर जाऊ. हे सरकार स्थिर अशून या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असं फडणवीस म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube