Hemangi Kavi: अभिनेत्री हेमांगीच्या सासूबाईचा शेजाऱ्याच्या टोमण्याला जबरदस्त उत्तर, म्हणाल्या…

Hemangi Kavi : लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) हिने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. हेमांगीने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्हीमध्ये काम करत चाहत्यांच्या मने जपली आहे. सिनेमासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 17T164402.808

Hemangi Kavi

Hemangi Kavi : लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) हिने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. हेमांगीने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्हीमध्ये काम करत चाहत्यांच्या मने जपली आहे. सिनेमासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.


आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमांगीने तिच्या सासरच्या घरच्यांनबद्दल अनेक गोष्टीचे खुलासे केले आहे. तिच्या सासूबाई नेहमी तिला कशा पाठिंबा द्यायच्या, तिला कशा सांभाळून घेत असल्याचे हे तिने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. हेमांगीने नुकतीच प्लॅनेट मराठीच्या पॉडकास्टवर (Marathi Podcasts) हजेरी लावण्यात आली होती. त्यामध्ये तिने तिच्या फेसबुकवर बाई बूब्स आणि ब्रा या पोस्टविषयी अनेक गोष्टी सांगितले आहे.

या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी तिला आपला पाठिंबा दिला तर अनेकांनी आपल्याशी बोलणं टाकलं असं तिने यावेळी सांगितले. (Hemangi Kavi On Mother In Law ) या पॉडकास्टमध्ये सासूबाईंबद्दल बोलताना हेमांगी म्हणाली, ‘माझ्या आई- वडिलांची पुण्याई की मला असं सासर भेटलं आहे. इथे बोलायचं म्हणून नाही सांगत पण तसंच आहे.

Chris Perera Arrested: अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीला अटक

माझं सासरसुद्धा अगदी टिपिकल मिडल क्लास आणि सासू माझी एकदम खमकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कसं आहे ना घरच्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नसते, पण हे जे इमारतीमधील किंवा आजूबाजूचे लोकांना खूप प्रश्न पडलेले असतात. ना त्यांना प्रॉब्लेम असतो की अरे तुमची सून १०- १० वाजेपर्यंत सकाळी झोपलेली असते. तर माझी सासू खमकी, ती म्हणायची की, ती रात्री १२ वाजता येते शुटिंगवरून. मग ती १० वाजेपर्यंत झोपू दे किंवा १२ वाजेपर्यंत झोपू दे, तुम्हाला काय प्रोब्लेम आहे?’ अशी नेहमी तिची सासू शेजाऱ्यांना ठमकावते.

Exit mobile version