Chris Perera Arrested: अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीला अटक

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 17T153722.805

Chris Perera Arrested: ‘सडक २’ आणि ‘बाटला हाऊस’ सारख्या सिनेमामध्ये झळकणारी बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) क्रिसन परेरा (Chris Perera) हिला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी (Smuggling Case) अटक करण्यात आली. सध्या शारजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ती जवळपास दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. भारतीय दूतावासाने अभिनेत्रीच्या अटकेची माहिती कुटुंबीयांना दिली आहे.

मात्र या प्रकरणातील क्रिसन ही आरोपी नसून पीडित असल्याचा तिच्या कुटुंबानी दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रिसन परेरा शारजाह विमानतळावर उतरल्यावर लगेचच तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी तिला अटक करण्यात आले होते. तेव्हापासून तिचे कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. भारतीय दूतावासाने सांगितले आहे की अभिनेत्रीला अटक केल्यानंतर ७२ तासांनंतर ही माहिती देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by INDECISIVE | Slow Fashion 🕊 (@wear.indecisive)


क्रिसन परेराच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार की, “तिला रवी नावाच्या व्यक्तीने फसवले आहे. त्याने सर्वप्रथम क्रिसनची आई प्रेमिल परेरा यांच्याशी संपर्क केला. रवी नावाच्या या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार की तो एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहे. आईने रवीची ओळख क्रिसनशी करून दिली होती. काही भेटीनंतर दुबईत वेब सीरिजसाठी ऑडिशन होणार असल्याची चर्चा सुरू होती. तिच्या प्रवासाचे संपूर्ण बुकिंग रवीनेच केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chrisann Pereira (@chrisannpereira)


क्रिसनच्या आईने दिलेल्या माहितीनुसार की, दुबईला जाण्याअगोदर रवीने क्रिसनला एक ट्रॉफी दिली. तो स्क्रिप्टचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या ट्रॉफीमुळे क्रिसनला विमानतळावरच अधिकाऱ्यांनी पकडले होते, तेव्हा त्यातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यानंतर १० एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचे आरोप लावण्यात आले होते.

चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

दरम्यान, रवी नावाची व्यक्ती सध्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिसन परेराच्या कुटुंबाने या प्रकरणासाठी दुबईत वकील नेमला आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, वकिलाची फी १३ लाख रुपये आहे आणि ते त्यांच्या मुलीला सुखरूप परत आणण्यासाठी घरदेखील गहाण ठेवायला तयार आहेत, कारण या प्रकरणात २०-४० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

क्रिसन परेराच्या कुटुंबीयांनी ड्रग तस्कर रवीला अटक करण्याकरिता मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिस यूएई सरकारकडून आरोपांच्या अधिकृत प्रतीची वाट बघत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us