Hindi Film Saiyaara Box Office Collection In Five Days : यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांचा ‘सैयारा’ (Saiyaara) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियासह बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटाचे संगीत आधीच वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम ठरत आहे. यात फहीम-अर्सलान यांचे टायटल ट्रॅक सैयारा, जुबिन नौटियाल यांचे बर्बाद , विशाल मिश्रा यांचे तुम हो तो, सचेत-परंपरा यांचे हमसफर आणि अरिजीत सिंग आणि मिथून यांचे धुन हे गाणे देशभरातील म्युझिक चार्ट्स वर धुमाकूळ घालतात आहेत.
कल्याण मारहाण प्रकरणी नवा ट्विस्ट, रिसेप्शनिस्ट तरुणीने आधी आरोपीच्या वहिनाला लगावली कानशिलात…
‘सैयारा’ 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अहान पांडेने (Ahaan Pandey) ‘सैयारा’ चित्रपटात ‘कृष कपूर’ नावाच्या रॉकस्टारची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अनिता पद्ढा (Anita Paddha) ‘वाणी’च्या भूमिकेत दिसली आहे. वाणी क्रिशच्या बँडसाठी गाणी लिहिते. दोघांमध्ये प्रेम सुरू होते, परंतु कथेत ट्विस्ट येतो जेव्हा वाणी एका दृश्यात अहानला चाकूने धमकावताना दिसते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मत चोरी; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा गंभीर आरोप
दरम्यान या चित्रपटाने रिलीजच्या पाचही दिवशी आणि विकेंटला बक्कळ कमाई केली आहे. YRF आणि मोहित सुरी यांच्या सैयारा या चित्रपटाने भारतात 48.25 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने अहान पांडे आणि अनित पड्डा यांना एका रात्रीत स्टार आणि संपूर्ण देशाचे लाडके बनवले आहे. तर चित्रपटाच्या तीन दिवसांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर शुक्रवारी – ₹ 22 कोटी, शनिवारी – ₹ 26.25 कोटी, रविवारी – ₹ 36.25 कोटी, सोमवारी – ₹ 24.25 कोटी, सोमवारी – ₹ 25.00 कोटी, एकूण – ₹ 133.75 कोटी. अशी कमाईची शिखर गाठतं या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. त्यामुळे 2025 मध्ये बॉक्सऑफिसवर सैयाराची चलती आहे. असं म्हणायला हरकत नाही.
सर्वात मोठी बातमी, ऑपरेशन सिंदूरवर संसदेत 29 जुलैपासून चर्चा
लोकांच्या प्रतिक्रिया लोक म्हणतात की, अहान पांडेने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो इतर ‘नेपोकिड्स’पेक्षा वेगळा दिसतो. एका युजरने लिहिले, “अहानने खरोखर प्रयत्न केला आहे, असे दिसते की तो अभिनय जाणतो.”
राज्यपाल योग्य तेच बोलतात; मराठी हिंदी वादवरील राज्यपालांच्या वक्तव्याला फडणवीसांचं समर्थन
दुसऱ्याने लिहिले, “अनन्या पांडेच्या भावाच्या अभिनयाकडे पाहून असे वाटते की त्याला त्याच्या अभिनयाच्या आधारे लाँच केले जात आहे, तो एक नेपोकिड आहे म्हणून नाही.” अनेकांनी मोहित सुरीच्या ट्रेलर कटिंग स्किलचे कौतुकही केले. काही जण या चित्रपटाच्या ट्रेलरची तुलना ‘आशिकी २’ आणि ‘एक व्हिलन’ सारख्या चित्रपटांशी करत आहेत.