राज्यपाल योग्य तेच बोलतात; मराठी हिंदी वादावरील राज्यपालांच्या वक्तव्याला फडणवीसांचं समर्थन

राज्यपाल योग्य तेच बोलतात; मराठी हिंदी वादावरील राज्यपालांच्या वक्तव्याला फडणवीसांचं समर्थन

CM Devendra Fadanvis Support to Governer CP Radhakrishanan in Marathi Hindi Language dispute : मराठी आणि हिंदी वादात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उडी घेतली आहे. त्यांच्या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Hindi ) कोणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का, असं वक्तव्य राज्यपालांनी केलंय. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपलांच्या या वक्तव्याला समर्थन दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

राज्यपाल हे संवैधानिक आहेत. राज्यपालांना कोणत्याही राजकीय वादात ओढणे चुकीची आहे. पण राज्यपाल जे योग्य आहे तेच बोलतात. असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात व्यक्त केले. मराठी भाषेवरून राज्यात वाद सुरू आहे. या वादामध्ये राज्यपालांनी उडी घेतली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राजकीय वादात ओढणे चुकीचे आहे. राज्यपाल बोलतात ते योग्यच बोलतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यपालांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले.

मोठी बातमी! महादेव मुंडे खून प्रकरण आता SIT’कडं, वाल्मिक कराडच्या मुलावरं बांगरचे गंभीर आरोप

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विकास आराखडा तयार केला जाणार आहे. पंढरपूरचा विकास करणे म्हणजे चोरी नाही. कोणतीही गोष्ट लपून-छपून केली जाणार नाही. संदर्भात जे बाधित होणार आहेत. त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. परंतु कोणत्या पुढार्‍यांशी चर्चा करण्याची गरज नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Hina Khan : गोल्डन लेहेंग्यात हिनाचा रॉयल अन् मनमोहक अंदाज

काय म्हणाले होते राज्यपाल?

तुम्ही मराठी भाषेत बोलले नाही तर तुम्हाला मारले जाईल, असं धोरण तामिळनाडूमध्येही राबवलं जात आहे. तुम्ही येऊन मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकेन का? मारल्यानंतर मी लगेच मराठी बोलणे शक्य आहे का? असं विधान राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलंय. तसंच, आपण अशा प्रकारचा द्वेष पसवरला तर राज्यात कोणता गुंतवणूकदार येईल का? सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच छोट्याशा राजकीय लाभासाठी आपण असं करणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube