Download App

‘कांतारा 1’साठी कुंदापूर येथे भव्य कदंब साम्राज्य कोणी निर्माण केलं? घ्या जाणून…

  • Written By: Last Updated:

Hombale Films and Rishabh Shetty created Kadamba Empire : कांतारा सिनेमा 2022 मध्ये रिलीज झाल्यानंतर त्याने जगभरात सगळ्यांचं प्रेम आणि कौतुक मिळवलं. या चित्रपटाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभूतपूर्व विजय मिळवला. सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. चित्रपटाने (Kantara 1 Movie) भारताच्या मध्यभागी असलेली एक विलक्षण कथा आणली, ज्याने देशाच्या समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची जगाला ओळख करून दिली. हा चित्रपट सर्वात मोठा स्लीपर हिट म्हणून उदयास आला असताना त्याचा आगामी प्रीक्वल कांतारा चॅप्टर 1 घोषणेपासून सगळ्यांनी पुन्हा एकदा याबद्दल उत्सुकता (Bollywood News) दाखवली आहे. भूतकोला सणाचे प्रदर्शन करणाऱ्या कांतारामध्ये सगळ्यांनी पाहिल्याप्रमाणे आता कांतारा: अध्याय 1 मध्ये कदंब कालावधीसमोर आणण्यासाठी आता सज्ज आहे.

कांतारा अध्याय 1 (Kantara 1) हा एक अद्भत प्रकारचा अनुभव असल्याचे वचन देतो. हा चित्रपट कर्नाटकातील कदंब काळातील आहे. कदंब हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वपूर्ण शासक होते आणि त्यांनी या प्रदेशातील वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात मोठी भूमिका बजावली. हा काळ मोठ्या पडद्यावर पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्माते, होंबळे फिल्म्स (Hombale Films) आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी (Rishabh Shetty) कुंदापूर येथे कदंब साम्राज्य जिवंत केले आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदाणी? संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

निर्मात्यांनी या कथेला जिवंत करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अगदी चित्रपटासाठी संपूर्ण स्टुडिओ तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला, त्यांनी एक विस्तृत सेटिंग तयार करण्यासाठी 80 फूट उंचीचा एक भव्य सेट शोधला, परंतु त्यांना योग्य काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी एक पाऊल पुढे टाकून स्वतःचा स्टुडिओ बांधला.

प्राइम व्हिडिओने केली “वॉक गर्ल्स”च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची घोषणा! ‘या’ तारखेला होणार जगभरात प्रिमियर

या व्यापक प्रयत्नामागील कारण म्हणजे कदंब घराण्याचे महत्त्व, ज्याने भव्य दक्षिण भारतीय वास्तुकलेची सुरुवात केली. कदंब काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या ऐश्वर्य आणि मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी ओळखला जातो. कांतारा: अध्याय 1 या काळात सेट केला आहे. प्रीक्वलमधून चित्रपटाच्या विविध बाजू दिसणार आहेत. निर्माते या युगाची पुनर्निर्मिती करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसून ते हा चित्रपट साकारण्यासाठी अनेक आव्हान स्वीकारत आहेत. अत्यंत अपेक्षीत “कांतारा अध्याय 1” सह पूर्वी कधीही न झालेल्या दिव्य अनुभवाचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन निर्मात्यांकडून करण्यात आलंय.

 

follow us

संबंधित बातम्या