होम्बले फिल्म्सचा मोठा एलान: ‘महावतार नरसिंह’च्या पुढील अवताराच्या शीर्षकाची घोषणा उद्या!

सात भागांच्या ‘महावतार सिनेमॅटिक विश्वा’तील ही पहिली कडी असून, आता दुसऱ्या अध्यायासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे!

Untitled Design (44)

Untitled Design (44)

Hombley Films big announcement : होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्सची भव्य अॅनिमेशन चित्रपट ‘महावतार नरसिंह’, दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला, अॅनिमेशन विश्वात मैलाचा दगड ठरला आहे आणि यशाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. सात भागांच्या ‘महावतार सिनेमॅटिक विश्वा’तील ही पहिली कडी असून, आता दुसऱ्या अध्यायासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे!

होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स निर्मित ‘महावतार नरसिंह’ 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने आपल्या जबरदस्त यशाने चित्रपटगृहांमध्ये वेगळाच ठसा उमटवला. अश्विन कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट एक नवा सिनेमाई आदर्श ठरला, ज्याने सांस्कृतिक कथा अत्यंत भव्य आणि आकर्षक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडली. आता निर्माते सात चित्रपटांच्या या ‘महावतार सिनेमॅटिक विश्वा’च्या दुसऱ्या भागाचा उलगडा करण्यासाठी सज्ज झाले असून, त्याची घोषणा उद्या केली जाणार आहे.

मोठ्या शीर्षक घोषणेसाठी वातावरण तयार करताना निर्मात्यांनी एक झलक चित्रफीत सादर केली आहे. ‘महावतार नरसिंह’मधील दृश्यांची आठवण करून देणारी ही झलक प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या करते आणि पुढील अध्यायाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवते. या भव्य उलगड्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महावतार नरसिंह’ने आपल्या प्रचंड यशाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले. सुमारे 40 कोटी रुपयांच्या खर्चात तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात 300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांवर आधारित सात चित्रपटांच्या या प्रस्तावित विश्वातील ही पहिली निर्मिती होती, ज्याने भारतीय संस्कृती आणि कथा जागतिक स्तरावर पोहोचवल्या.

अनुसूचित जाती-जमातींचं प्रतिनिधित्व रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेचा आरोप

चित्रपटातील दृश्य प्रभाव, पार्श्वसंगीत आणि कथा — प्रत्येक बाबतीत उत्कृष्टता दिसून आली आणि सर्वत्र त्याचे कौतुक झाले. ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनावेळी चित्रपटगृहांमध्ये एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. प्रेक्षक इतके भावनिकरित्या जोडले गेले की चित्रपटगृहे जणू मंदिरांसारखी भासू लागली. चित्रपट पाहताना प्रेक्षक भक्तिभावाने भारावून गेले आणि भजन, कीर्तन व जयघोष यांचा नाद थिएटरमध्ये घुमू लागला. भारतीय सांस्कृतिक कथेला इतक्या प्रभावीपणे पडद्यावर पाहणे हा अत्यंत भावनिक अनुभव ठरला.

‘महावतार नरसिंह’च्या माध्यमातून होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्सने पुन्हा एकदा त्यांच्या विषयावरील पकडीची ताकद सिद्ध केली आहे. ‘केजीएफ अध्याय 1’, ‘केजीएफ अध्याय 2’, ‘कांतारा’, ‘कांतारा: अध्याय 1’ आणि ‘सालार: भाग 1 – सीजफायर’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांनंतर या निर्मिती संस्थेने सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अश्विन कुमार दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते विजय किरागांदूर आणि शिल्पा धवन असून, चित्रपटाचे संगीत सॅम सी. एस. यांनी साकारले आहे.

Exit mobile version