Honey Singh Divorce With Shalini Talwar : लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंह (Honey Singh) आणि वाद हे कायमचं समीकरण झालं आहे. (Yo Yo Honey Singh) अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यामुळे हनी सिंह कायम चर्चेत असतो. परंतु आता हनी सिंह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे. हनीचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar) त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे धक्कादायक आरोप केले होते.
लग्नाच्या 12 वर्षांनंतर हनी सिंह अन् शालिनी विभक्त झाले आहेत. यांच्या घटस्फोटाला दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने (Delhi Court) मंजुरी दिली आहे. हनी आणि शालिनी यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून घटस्फोटाचा खटला सुरू असल्याचे बघायला मिळत होते. अखेर आज लग्नाच्या 12 वर्षांनंतर ते विभक्त झाले आहेत.
हनी सिंह आणि शालिनी तलवार 2011 साली लग्नबंधनात अडकले होते. 2021 मध्ये हनी सिंह आणि शालिनी यांनी घटस्फोटासाठी दिल्लीमधील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शालिनीने हनी सिंहवर कौटुंबिक हिंसाचार तसेच मानसिक छळ असे धक्कादायक आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता.
Elvish Yadav: मोठी बातमी! एल्विश यादव प्रकरणाचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर
यो यो हनी सिंह आणि शालिनी तलवार यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. लग्नाच्या अगोदर खूप वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. अखेर 2011 मध्ये ते बोहल्यावर चढला होता. संसार थाटल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यात सर्वकाही व्यवस्थित होतं. शालिनीने 2021 मध्ये हनी सिंहवर घरगुती हिंसाचार आणि मारहाण, मानसिक तणावासह अनेक धक्कादायक आरोप लावले होते. 2022 मध्ये घटस्फोटासाठी हनी सिंहला न्यायालयात हजर राहायचं होतं. परंतु काही कारणाने त्याला न्यायालयात हजर राहता आले नाही. त्यावेळी न्यायालयाने हनी सिंहला फटकारलं आहे. आता घटस्फोटाची याचिका दाखल केल्यावर 2 वर्षांनी हनी सिंह आणि शालिनी एकमेकांपासून विभक्त (Honey Singh Divorce) झाले आहेत.