Download App

Horror Film Festival : मुंबईकरांची दातखिळी बसणार, आजपासून रंगणार हॉरर फिल्म फेस्टिवल

मुंबई : अनेक प्रकारचे फिल्म फेस्टिवल पाहतो मात्र आता मुंबईकरांना एका अनोख्या फिल्म फेस्टिवलची मेजवानी मिळणार आहे. तसं पाहिलं तर असे खूप कमी लोक असतात जे घाबरत अंधाराला किंवा भूत या कल्पनेला घाबरत नाहीत. पण हॉरर फिल्म पाहायला आवडणारे अनेक लोक असतात. त्यामुळे अशाच भयावह, अंगावर काटा आणणाऱ्या हॉरर फिल्म आता मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. मुंबईत हॉरर फिल्म फेस्टिवल भरणार आहे.

मुंबईत पहिल्यांदाच आशा प्रकारे हॉरर फिल्म फेस्टिवल भरणार आहे. वेन्च फिल्म फेस्टिवल असं या फेस्टिवलचं नाव आहे. 10 ते 20 मार्चपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे. यामध्ये जगभारातील विविध भाषांमधील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तब्बल 23 फिल्म्स यामध्ये दाखवण्यात येणार आहेत. या फेस्टिवलचं आयोजन मुंबईतील हरकत स्टूडिओ आणि वेद फॅक्ट्रीमध्ये 10 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत होणार आहे. या दरम्यान व्हर्चुअल स्क्रीनिंग 10 ते 20 मार्च 2023 पर्यंत आणि फिजिकल स्क्रीनिंग 17 ते 20 मार्च 2023 पर्यंत असणार आहे.

हॉरर फिल्म फेस्टिवल स्पॅनिश फिल्म ‘ह्युसेरा: द बोन वुमन’ ने सुरू होईल. ही फिल्म मिशेल गरजा सेरवरने दिग्दर्शित केली आहे. तर एलिस वॅडिंग यांची ‘द नाइटमेयर’ ने फेस्टिवलचा समारोप होणार आहे. हाइलाइट्समध्ये पॅनल चर्चा आणि संगीत प्रदर्शनासह ‘तुंबाड’चं विशेष स्क्रीनिंग असणार आहे. या फेस्टिवलमध्ये तीन वेगवेगळ्या श्रेणीत फिल्म्स दाखवण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिल्या श्रेणीत 40 मिनटांहून अधिक वेळ असणाऱ्या फिल्म्स आहेत. दुसऱ्या श्रेणीत 10 ते 40 मिनिटं आणि तिसऱ्या श्रेणीत 10 मिनटांहून कमी शॉर्ट फिल्म्सचा समावेश आहे.

>Satish Kaushik Death : मी माझ्या लहान भावाला गमावले, सतीश कौशिक यांच्या निधनाने अनिल कपूर भावूक

त्यामध्ये असे अनेक हॉरर चित्रपट आहेत ज्यांच जगभरामध्ये कौतुक केलं जात आहे. त्यापैकी काही पुढील प्रमाणे, ह्युसेरा: द बोन वुमन, द नाइटमेयर, तुंबाड, रप्चर, हनीकॉम्ब, कालीराठी, निट वन स्टॅब टू, वोल्फ व्हिसल, हेक्सेटिक फेज, सकर, फ्यूरिया, इट टेक्स अ विलेज, द सॉफ्टबॉय, आलो/द लाइट, थ्री वेज टू डाइन वेल, लालन्नास सॉन्ग, द एस्ट्रोनॉट एंड हिज पॅरेट, एब्नॉर्मल प्राईम टाईम.

Tags

follow us