Satish Kaushik Death : मी माझ्या लहान भावाला गमावले, सतीश कौशिक यांच्या निधनाने अनिल कपूर भावूक
मुंबई : ख्यातनाम अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी काल रात्री वयाच्या 67 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. दरम्यान, कौशिक यांनी निधनाच्या एक दिवस आधी आपल्या निकटवर्तीयांसोबत होळी साजरी केली होती. मात्र, काल रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये (Fortis Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, डॉक्टर कौशिक यांना वाचवण्यात अपयशी ठरले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
दरम्यान सतीश कौशिक यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि अभिनेते अनिल कपूर (Anil Kpoor) यांनी देखील सतीश कौशिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अनिल कपूरने ट्वविटरवर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्याने आपला आणि सतीश कौशिकमधील खास बॉन्ड शेअर केला आहे. त्याने या पोस्टमध्ये सतीश कौशिकचा फोटो पोस्ट केला आहे.
The Laurels of the industry have lost their Hardy…the Three Musketeers have lost the most talented, generous and loving Musketeer and I have lost my younger brother…gone too soon…
I love you Satish ♥️@AnupamPKher pic.twitter.com/z8pkHEBTPd— Anil Kapoor (@AnilKapoor) March 9, 2023
या पोस्टला कॅप्शन देताना अनिल कपूर यांनी लिहिले की, ‘इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लोकांनी आपल्या हार्डीला गमावले आहे. थ्री मस्कटियर्सने सर्वांत प्रतिभाशाली, उदार आणि प्रेम करणाऱ्या मस्कटियरला गमावलं आहे. तर मी माझ्या लहान भावाला गमावले आहे. खुप लवकर गेला. बहुत जल्दी चला आय लव यू सतीश.’ अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनिल कपूर आणि सतीश कौशिक 80 च्या दशकापासून एकमेकांसोबत काम करत आहेत. 1983 मध्ये त्यांनी ‘वो सात दिन’, मध्ये सोबत काम केलं. हा अनिल आणि सतीशचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट दोघांसाठी खास होता. कारण अनिल कपूरला मुख्य भूमिका मिळालेला हा पहिला चित्रपट होता तर सतीश कौशिक यांचा हा पहिला चित्रपट होता.
फार्महाऊसवर सतीश कौशिक नेमके कधी पोहचले? तिथं त्यांच्यासोबत काय झालं?; पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान आता कौशिक यांच्या अचानक निधनानंतर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) त्याचा तपास सूरू आहे. कौशिक यांचा मृत्यू का आणि कशामुळे झाला? त्यांच्यासोबत शेवटच्या क्षणी कोण मित्र-मंडळी होती, याचीही चौकशी केली जात आहे. कौशिक यांनी निधनापूर्वी मित्र आणि कुटूंबियांसोबत होळीचा सन साजरा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी 7 मार्चला ख्यातनाम अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मुंबईतील घरात होळी साजरी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अन्य निकटवर्तीय मित्र-मंडळी देखील होते.