Download App

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘’फाइटर’’चा धुमाकूळ, चौथ्या दिवशी 100 कोटींची कमाई

Fighter Box Office Collection Day 4: हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली होती. (Box Office Collection) दुसऱ्या दिवशी चित्रपटाने प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत दमदार कलेक्शन केले. वीकेंडलाही ‘फायटर’ने जबरदस्त कमाई केली आणि रविवारी या चित्रपटाने मोठा इतिहास रचला आहे. ‘फाइटर’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी एकूण किती कलेक्शन केले आहे.

‘फाइटर’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी किती कमाई केली? ‘फायटर’ हा देशप्रेमाने भरलेला सिनेमा आहे, तर तो भावना आणि रोमान्सने भरलेले मनोरंजनाचे पॅकेज आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी चित्रपटगृहांमध्ये होत आहे.


त्याचबरोबर ‘फायटर’ला प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीसह वाढवलेल्या वीकेंडचा पुरेपूर लाभ मिळाला असून यासोबतच याने अवघ्या चार दिवसांत 100 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘फाइटर’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 22.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुस-या दिवशी ‘फाइटर’ने 39.5 कोटी तर तिसऱ्या दिवशी 27.5 कोटींची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवसाच्या म्हणजेच पहिल्या रविवारच्या कमाईचे आकडे आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘फाइटर’ने रिलीजच्या चौथ्या दिवशी 28.50 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच ‘फायटर’चे चार दिवसांचे एकूण कलेक्शन आता 118.00 कोटी रुपये झाले आहे.

Bigg Boss 17 Winner : मुनव्वर फारूकी ठरला बिग बॉसचा महाविजेता!, अभिषेक कुमार राहिना रनर अप

‘फायटर’ने जगभरात किती कमाई केली? ‘फायटर’ची क्रेझ देशालाच नाही तर संपूर्ण जगाला वेठीस धरत आहे. या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मनोबाला विजयबालन यांनी ‘फायटर’च्या जगभरातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार ‘फाइटर’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 36.04 कोटी, दुसऱ्या दिवशी 64.57 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 56.19 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह ‘फायटर’चे तीन दिवसांचे जगभरातील कलेक्शन 156.80 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चौथ्या दिवशी हा चित्रपट 200 कोटींचा आकडा गाठेल अशी आशा आहे.

follow us