Download App

Fighter New Poster : हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या ‘फायटर’चं नवं पोस्टर रिलीज

Fighter Movie New Poster Release: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित आगामी ‘फायटर’ (Fighter Movie) हा चित्रपट चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड क्रेझ निर्माण करत आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण, (Deepika Padukone) अनिल कपूर स्टारर हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत 25 जानेवारी 2024 पासून रुपेरी पडद्यावर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी एरियल अॅक्शन फिल्म पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहे.


चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजसे जवळ येत आहे, तसतसे निर्माते देखील नवनवीन पोस्टर शेअर करून चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहेत. अलीकडेच त्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर रिलीज केले आहेत, चित्रपटाच्या कॅनव्हास आणि स्केलबद्दल कल्पना दिली आहेत. चित्रपटातील हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर या त्रिकुटाचे वैशिष्ट्य असलेले हे नवीन पोस्टर चित्रपटाची अपेक्षा वाढवत आहेत. आणि लार्जर दॅन लाईफ सिनेमॅटिक अनुभवासह चाहते सिनेमाला मोठ्या प्रमाणात गर्दी करणार असल्याचं आश्वासन निर्मात्यांनी दाखवला आहे.

सोशल मीडियावर या पोस्टरची एक झलक शेअर करत हृतिक रोशनने लिहिले आहे की, “एअर ड्रॅगन फक्त 1 महिन्यात तुम्हाला भेटायला तयार आहेत! फायटर फक्त मोठ्या स्क्रीनवर पहा! 25 जानेवारी 2024 पासून 3D आणि IMAX थिएटरमध्ये. भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनीदिवशी नक्की भेटूया. प्रजासत्ताक दिनानिमित्त. दीपिका पदुकोणने फायटरसाठी तिचा उत्साह दाखवला आणि लिहिले आहे की, “एक महिना बाकी! 25 जानेवारी 2024 रोजी फक्त थिएटरमध्ये फायटरचा अनुभव घ्या. अशी पोस्ट त्यांनी यावेळी केली आहे.

Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

‘फायटर’मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फायटरमध्ये हवाई कारवाई पूर्ण होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी 2024 दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us