Fighter: ‘बँग बँग ते फायटर’ सिद्धार्थ आनंद अन् हृतिक रोशनचा तिसरा प्रोजेक्ट ठरणार !

Fighter: ‘बँग बँग ते फायटर’ सिद्धार्थ आनंद अन् हृतिक रोशनचा तिसरा प्रोजेक्ट ठरणार !

Fighter Movie : सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. आता सिद्धार्थचा एरियल अॅक्शन ड्रामा ‘फायटर’ (Fighter Movie) हा 2024 चा सर्वात अपेक्षित चित्रपट ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)


अनेक अफलातून प्रोजेक्ट्स: सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन ही डायनॅमिक जोडी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या सिनेमात दिसणार आहे. एक उत्तम दिग्दर्शक-अभिनेता असलेली ही जोडी आता काय नवीन घेऊन येणार हे बघण चाहत्यांना उत्सुकतेचं ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन ने या आधी अनेक नवे अफलातून प्रोजेक्ट्स केले. Bang Bang (2014) आणि वॉर (2019) या दोन ब्लॉकबस्टर नंतर आता ‘फायटर’ लवकरच येणार आहे.

रुपेरी पडद्यावर अनोखी जादू: ही डायनॅमिक जोडी कायम एकत्र काम करून धमाकेदार प्रोजेक्ट करते आणि प्रत्येक वेळी ते एकत्र येतात, तेव्हा रुपेरी पडद्यावर अनोखी जादू निर्माण करतात. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत 2019 मध्ये रिलीज झालेल्या वॉरने बॉक्स ऑफिसवर 475 कोटींहून अधिक कमाई केली तर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनीत बँग बँगने 330 कोटींहून अधिक कमाई केली. त्यांच्यात काय साम्य आहे ते म्हणजे या दोघांचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते.

Fighter Movie: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाच चित्रीकरण केलं पूर्ण

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार: ‘फायटर’ बद्दल देखील व्यापार विश्लेषक तसेच नेटिझन्स हॅट्रिकची अपेक्षा करत आहेत. सिद्धार्थ आनंदने फायटरमधील त्याच्या पात्रांसाठी बिग बँग प्लॅन केला आहे. फायटरमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर आणि तलत अजीज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फायटरमध्ये हवाई कारवाई पूर्ण होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube