Download App

एनटीआरची अ‍ॅक्शन अन् कियारा-ह्रतिकची केमेस्ट्री; वॉर 2 चा ट्रेलर रिलीज प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

War 2 ची एक खास झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. कारण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Hrithik Roshan NTR Kiara Advani Ayan Mukerji War 2 Film Trailer release : ऋतिक-एनटीआरचा ‘वॉर 2′ मध्ये (War 2) महास्फोटक सामना चाहत्यांना दिसणार आहे. त्याची एक खास झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. कारण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अबब! फक्त पाच वर्षांत 10 लाख भारतीय झाले विदेशी; नागरिकत्व सोडण्याची कारणेही धक्कादायक

कसा आहे ट्रेलर?

या ट्रेलरमध्ये सर्वांनाच आपेक्षित असणारं जबरजस्त अ‍ॅक्शन आहे. ह्रतिक रोशन आणि ज्युनिअर एटीआरची शानदार एन्ट्री, डॉयलॉगबाजी, आणि अॅक्शनने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. हा यशराज फिल्म्सच्या (वायआरएफ ) स्पाय यूनिव्हर्समधील अ‍ॅक्शन थ्रिलर असलंल्याचं ट्रेलरमध्ये क्षणोक्षणी दिसत आहे. त्याच प्रमाणे कियारा ह्रतिकची खास केमेस्ट्री देखील या ट्रेलरला आणि अंतिमत: चित्रपटाला चार चॉंद लावणार एवढं नक्की.

‘वॉर 2’ मध्ये 25 या अंकाला विशेष महत्त्व!

यशराज फिल्म्सच्या (वायआरएफ ) स्पाय यूनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर ‘वॉर 2’ मध्ये ऋतिक रोशन आणि एनटीआर यांची जोडी (Entertainment News) एकत्र पाहायला मिळणार आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे आदित्य चोप्रा यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये ऋतिक रोशन आणि एनटीआर दोघांचेही चित्रपटसृष्टीतील 25 वर्षे पूर्ण होत आहेत. वायआरएफ ही ऐतिहासिक संधी साधत 25 जुलै रोजी ‘वॉर 2’ चा ट्रेलर रिलीज करणार आहे.

सेनेतील आमदारांकडूनच शिंदेंचा गेम? मंत्र्यांची लिस्ट अन् दिल्लीतला मास्टर प्लान, राऊतांनी सांगितला

वायआरएफ ने आज त्यांच्या सोशल मीडियावर ट्रेलर लॉन्चबाबत अधिकृत घोषणा करत म्हटलं, 2025 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन आयकॉन्स त्यांचा वैभवशाली प्रवासाचे 25 वर्षे पूर्ण करत आहेत. या एकदाच येणाऱ्या संधीचा सन्मान करण्यासाठी, वायआरएफ 25 जुलै रोजी ‘वॉर 2’ ट्रेलर लॉन्च करणार आहे! टाइटन्सच्या या महाकाव्य संघर्षासाठी तयार व्हा! आपले कॅलेंडर नक्की मार्क करा.

अहिल्यानगरमध्ये जमावाकडून घरावर हल्ला; तूफान राड्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर

‘वॉर 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कियारा अडवाणी प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.

follow us